'अलिबागहून आलायस का?' या वाक्यप्रचारावर बंदी आणायला कोर्टाचा नकार

'अलिबागहून आलायस का?' या वाक्यप्रचारावर बंदी आणायला कोर्टाचा नकार

अलिबागहून आलायास का ? या वाक्यात असं काय अपमानजनक आहे की त्यावर बंदी आणावी, असा प्रश्न कोर्टाने विचारला आहे. अशा वाक्यप्रचारांची मजा घेतली पाहिजे. यामुळे कुणीही अपमानित होण्याचं काही कारण नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई, 19 जुलै : एखाद्या व्यक्तीला शहरातली एखादी गोष्ट माहीत नसेल तर तू काय अलिबागहून आलायस का ? असा टोला मारला जातो. किंवा एखाद्याला मूर्ख म्हणायचं असेल तरी हा वाक्यप्रचार वापरला जातो. याला आक्षेप घेत मुंबई हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती. पण कोर्टाने या वाक्यप्रचारावर बंदी आणायला नकार दिला आहे.

अलिबागहून आलायास का ? या वाक्यात असं काय अपमानजनक आहे की त्यावर बंदी आणावी, असा प्रश्न कोर्टाने विचारला आहे. मुख्य न्यायाधीश प्रदीप नंदराजोग यांनी या प्रकरणी निर्णय दिला.प्रत्येक भाषेमध्ये असे काही किस्से किंवा गंमतीदार वाक्यप्रचार असतातच. अशा वाक्यप्रचारांची मजा घेतली पाहिजे. यामुळे कुणीही अपमानित होण्याचं काही कारण नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे.

दिवाळीच्या आधीच करा सोनं खरेदीचा विचार; वाढणार आहेत किमती!

अलिबागजवळच्या सातिरजे गावातले राजेंद्र ठाकूर यांनी मार्च 2019 मध्ये मुंबई हायकोर्टामध्ये याबद्दल याचिका दाखल केली होती. या जनहित याचिकेमध्ये अलिबागहून आलायस का? या वाक्यप्रचारावर बंदी आणावी, अशी मागणी करण्यात आली होती.

अलिबागहून आलायस का? हा वाक्यप्रचार पूर्ण महाराष्ट्रातच वापरला जातो. याला खास करून अलिबागकरांचा आक्षेप आहे, असं याचिकाकर्ते राजेंद्र ठाकूर यांचं म्हणणं होतं. पण आता कोर्टानेच यामध्ये काही गैर नाही, असं म्हटल्याने या वादावर पडदा पडला आहे.

========================================================================================

आदित्य ठाकरेंकडून राहुल गांधींची कॉपी, पाहा हा VIDEO

First published: July 19, 2019, 5:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading