मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ह्रदयविकाराच्या धक्क्यातून बरे होताच धनंजय मुंडेंनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली, म्हणाले...

ह्रदयविकाराच्या धक्क्यातून बरे होताच धनंजय मुंडेंनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली, म्हणाले...

'पूर्वी रामदास पाध्याय यांचा बोलक्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरू आहे.

'पूर्वी रामदास पाध्याय यांचा बोलक्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरू आहे.

'पूर्वी रामदास पाध्याय यांचा बोलक्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरू आहे.

  • Published by:  sachin Salve

सांगली, 19 एप्रिल : 'पूर्वी रामदास पाध्याय यांचा बोलक्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरू आहे. अर्धवटरावांचा खेळ सुरू आहे' असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (dhanjay munde) यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) यांची अर्धवटराव म्हणून खिल्ली उडवली.

राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेची इस्लामपूर येथील जाहीर सभा पार पडली. यावेळी राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी जोरदार भाषण करून भाजपवर एकच हल्लाबोल केला. धनंजय मुंडे यांना अलीकडेच ह्रदयविकाराच्या सौम्य धक्का आला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच त्यंना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यानंतर आज आजच्या सभेत बोलत असताना धनंजय मुंडेंनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.

('पैसे द्या, नाहीतर...', पनवेलमध्ये बँक कर्मचाऱ्यांच्या दादागिरीमुळे आत्महत्या)

'पूर्वी रामदास पाध्याय यांचा बोलक्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरू आहे. अर्धवटरावांचा खेळ सुरू आहे. अर्धवट राव आधी भाजपविरोधात खूप बोलायचे, सीडी लावायचे. एकदा ईडी घुसली आणि अर्धवटराव गप्प बसले, असा सणसणीत टोल धनंजय मुंडे यांनी लगावला.

खाज ठाकरे, अमोल मिटकरींनी उडवली खिल्ली

तर, शिवरायांच्या राजमुद्रेचा वापर करतात, पण ती प्रत्येक शिवभक्ताच्या तोंडी पाट असली पाहिजे. तुम्ही जर रामाचे खरे भक्त असाल तर केंद्रातील झेड सेक्युरिटी नाकारून अयोध्येला जावून दाखवा. राज ठाकरे यांना फुले शाहू आंबेडकर यांच्या नावाची अॅलर्जी आहे का? असं म्हणत अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांची खाज ठाकरे म्हणून खिल्ली उडवली.

जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

तुम्ही पुरंदरे आणि जेम्स लेन यांना निष्कारण उकरून बाहेर काढलंय, मी मग आता यांची हाड मोजायला लावणार आहे.  आताच पुरंदरे आणि जेम्स लेन आताच पुढे कसे आले, हा एक मोठा ट्रॅप आहे. पण तुम्ही त्यांना विनाकारण बाहेर काढले, आता जेम्स लेने आता कुठून आला,त्याची मुलखात घेतली कोणी ? अचानक पुरंदरे आणि जेम्स लेने बाहेर कसा आला,हा ट्रॅप आहे, अशी टीका आव्हाड यांनी केली.

2003 मध्ये आम्ही गोंधळ घातला ,रस्त्यावर उतरलो. माझी टिंगल करून काही होणार नाही, बापाला बाप भेटतो, आरेला, कारे म्हणायला तुकारामांनी शिकवले आहे, आम्ही तसेच देणार, असं म्हणत आव्हाड यांनी राज ठाकरेंना दिला.

First published: