मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'माफी मागा, अजून बरंच बाहेर निघेल', आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना इशारा

'माफी मागा, अजून बरंच बाहेर निघेल', आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना इशारा

खोटे बोलून मराठी तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी.

खोटे बोलून मराठी तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी.

खोटे बोलून मराठी तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 27 सप्टेंबर : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे राज्यातलं राजकारण तापलं आहे. आता भाजपने शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी एक पत्रक प्रसिद्ध करत आदित्य ठाकरेंना माफी मागण्याची मागणी केली आहे.

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे शिंदे सरकारची मोठी गोची झाली. आदित्य ठाकरे यांनी एकापाठोपाठ पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारवर आरोप केले. आज भाजपचे मुंबईचे शहर अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे पत्रक प्रसिद्ध केले आहे.

ठाकरे सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात वेदांत -फॉक्सकॉन कंपनीला ना जमीन दिली ना, कुठला करार केला. हा घ्या सरकारी पुरावा. प्रकल्प महाराष्ट्रात तुम्ही आणलाच नाही आणि गेला म्हणून ओरडता? अडीच वर्षे कंपनीला का लटकवले? टक्केवारीसाठी वाटाघाटी सुरु होत्या का? असा सवाल करत शेलार यांनी चौकशीची मागणी केली आहे.

या प्रकरणी खोटे बोलून मराठी तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी. चौकशीला समोरे जा...अजून बरेच निघेल. अन्यथा तरुणांची माथी भडकवणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे या प्रकरणी कायदेशीर कारवाई सरकारने का करु नये? असा इशाराही शेलार यांनी दिला आहे.

('...म्हणून महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेर जात आहेत', रोहित पवारांचा भाजपवर गंभीर आरोप)

याआधीही आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. 'आघाडी सरकारच्या काळात फॉक्सकॉन वेदांता प्रकल्पाला गुजरातपेक्षा चांगलं पॅकेज तुम्ही का दिलं नाही? याचं उत्तर द्या आणि मग पुढचे प्रश्न विचारा. तुम्ही हा प्रकल्प महाराष्ट्रात का आणू शकला नाहीत, सत्य लपवण्यासाठी गळे काढू नका. पेग्विन सेना ही प्रकल्प विरोधी सेना आहे,' असं ट्वीट आशिष शेलार यांनी केलं होतं.

First published: