रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांची तळोजा कारागृहात रवानगी

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांची तळोजा कारागृहात रवानगी

चार दिवस कोरोना सेंटरमध्ये ठेवण्यात आल्यानंतर आता गोस्वामी यांची रवानगी थेट तळोजा कारागृहात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • Share this:

अलिबाग, 08 नोव्हेंबर : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी(anvay naik suicide case) अटकेत असलेले रिपब्लिक टीव्ही (Republic TV editor ) वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी (arnab goswami)  यांची आता तळोजा कारागृहात (Taloja Jail) रवानगी करण्यात आली आहे. पुढील काही दिवस अर्णब गोस्वामी यांचा मुक्काम हा आता तळोजा कारागृहातच असणार आहे.

अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आल्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांना अलिबागमधील कोरोना सेंटर असलेल्या एका शाळेमध्ये क्वारंटाइन म्हणून ठेवण्यात आले होते. चार दिवस कोरोना सेंटरमध्ये पाहुणचार घेतल्यानंतर आता गोस्वामी यांची रवानगी थेट तळोजा कारागृहात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज सकाळी अर्णब गोस्वामी यांना अलिबागमधील कोविड सेंटर असलेल्या या शाळेतून नवी मुंबई जवळील तळोजा कारागृहाकडे घेऊन जाण्यात आले आहे. दुपारपर्यंत अर्णब गोस्वामी यांना तळोजा कारागृहाकडे स्वाधीन करण्यात येईल.

04 नोव्हेंबर रोजी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबईतील राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना अलिबागला नेण्यात आले होते. अलिबाग कोर्टात हजर केल्यानंतर गोस्वामी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

दरम्यान, गोस्वामी यांच्या विरुद्ध अलिबाग नंतर मुंबई पोलिसांनीही  FIR दाखल केला आहे. पोलिसांचं पथक अर्णब गोस्वामी यांच्या घरी पोहोचल्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी कलम 353 नुसार अर्णब गोस्वामींवर केला गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचा-यांशी हुज्जत घालणे  असे आरोप करत  गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

अन्वय नाईक यांची मुंबईत 'कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड' या नावाची कंपनी होती. मे 2018  अन्वय नाईक यांनी अलिबाग जवळील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यांच्या खिश्यात एक सुसाईट नोट आढळून आली होती. त्यात अर्णब गोस्वामी, आयकास्ट स्लॉशस्काय मीडियाचे फिरोज शेख, स्मार्ट वर्क्सचे नितेश सारडा यांनी आपले  पैसे थकविल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचं नमूद केले होते. त्यामुळे तिघांविरोधात आत्महत्येत प्रवृत्त केल्या प्रकरणी अलिबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Published by: sachin Salve
First published: November 8, 2020, 10:45 AM IST
Tags:

ताज्या बातम्या