मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'मिशन 2024'साठी आलेल्या अनुराग ठाकूरना कल्याण-डोंबिवलीच्या खड्ड्यांचा त्रास, आयुक्तांवर भडकले

'मिशन 2024'साठी आलेल्या अनुराग ठाकूरना कल्याण-डोंबिवलीच्या खड्ड्यांचा त्रास, आयुक्तांवर भडकले

Anurag Thakur in Kalyan

Anurag Thakur in Kalyan

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये मतदारसंघ उभारणीसाठी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर कल्याणमध्ये आले होते, पण खुद्द अनुराग ठाकूर यांनाच कल्याण-डोंबिवलीच्या रस्त्यांमधल्या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali), India
  • Published by:  Shreyas

कल्याण, 13 सप्टेंबर : लोकसभा निवडणूक 2024 मध्ये मतदारसंघ उभारणीसाठी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर कल्याणमध्ये आले होते, पण खुद्द अनुराग ठाकूर यांनाच कल्याण-डोंबिवलीच्या रस्त्यांमधल्या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागला. कल्याण-डोंबिवलीच्या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे अनुराग ठाकूर यांनी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांना खडेबोल सुनावले. शहराचे रस्ते आणि बकालपणाबाबतही अनुराग ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली.

कल्याण-डोंबिवलीचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश असूनही शहरातले खड्डे, ठिकठिकाणी पडलेला कचरा पाहून अनुराग ठाकूर चांगलेच संतापले. रविवारपासून अनुराग ठाकूर कल्याण-डोंबिवलीच्या रस्त्यांवर फिरून नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. शहराची बकाल अवस्था पाहून अनुराग ठाकूर यांनी महापालिकेच्या स्मार्ट सिटी कार्यालयालाही भेट दिली.

अनुराग ठाकूर कार्यालयात आल्यानंतर त्यांना पालिका अधिकाऱ्यांकडून नेहमीची स्मार्ट सिटी प्रकल्पाची व्हिडिओ क्लिप दाखवण्यात येत होती, त्यावेळी आपल्या शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश आहे, हे पाहून आश्चर्य वाटल्याची प्रतिक्रिया अनुराग ठाकूर यांनी आयुक्तांसमोरच दिली.

" isDesktop="true" id="760314" >

स्मार्ट सिटीमधली शहरं सुंदर, आखीव-रेखीव आहेत. स्मार्ट सिटीमधल्या शहरांमध्ये रस्ते चांगले आहेत, स्वच्छता आहे तसंच घनकचरा व्यवस्थापनही आहे. वृक्षसंवर्धनाचे उपक्रम राबवून शहरं देखणी करण्यावर भर देण्यात आला आहे, असे खडे बोल अनुराग ठाकूर यांनी आयुक्तांना सुनावले.

First published:

Tags: Dombivali, Kalyan