न्या.लोया मृत्यू प्रकरणी आमचा कुणावरच आक्षेप नाही - अनुज लोयाचं स्पष्टीकरण

न्या.लोया मृत्यू प्रकरणी आमचा कुणावरच आक्षेप नाही - अनुज लोयाचं स्पष्टीकरण

आज त्यांच्या मुलाने नागपुरात पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणी त्याचा आणि इतर कुटुंबियांचा कुणावरच आक्षेप नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 014 जानेवारी- न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूप्रकरणी आता  एक नवीन वळण आलं  आहे. आज त्यांच्या मुलाने   पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणी त्याचा आणि इतर कुटुंबियांचा  कुणावरच आक्षेप  नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

जस्टिस बी.एच. लोयांच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांच्या मनात कोणतीही शंका नसल्याचं त्यांचा मुलगा अनुज लोया यानं म्हटलंय. अनुज लोया यानं मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यानं लोया कुटुंबीयांची भूमिका मांडली. लोया यांना नागपुरात जेव्हा हार्ट अॅटॅक आला होता. त्यावेळी त्यांच्यावर योग्य उपचार झाले. लोया यांच्या मृत्यूबाबत काही बोलण्यासाठी काही संस्था आणि व्यक्ती हैराण करीत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. लोया यांच्या मृत्यूबाबत कोणतंही राजकारण करायचं नाही असंही त्यानं सांगितलं. कुणीही जस्टिस लोया यांच्या मृत्यूसंदर्भात कुटुंबाला काहीही विचारण्याचा प्रयत्न करू नये असंही अनुजनं शेवटी सांगितलं.

दोन वर्षांपूर्वी लोया यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी सोहराबुद्दीन खून खटल्यात विशेष न्यायाधीश म्हणून काम पाहत होते. त्यांच्या मृत्यूबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. याप्रकरणी कुटुंबिय वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्यात असल्यामुळे  भावनेच्या भरात   वेगवेगळे संशय व्यक्त गेले होते असं त्याने सांगितलं. पण आता कुठलेच संशय आमच्या मनी कुठलाच संशय नसल्याचं त्याने स्पष्ट केलंय.  दरम्यान याप्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणी काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी केली होती. सुप्रीम कोर्टाच्या  न्यायाधीशांनीही याचप्रकरणी न्यायाधीश नियुक्ती योग्य प्रकारे केलं नसल्याचं विधान केलं होतं.

दोन महिन्यांपूर्वी  एका मासिकात न्या. लोया यांच्या मृत्यूबद्दल काही खळबळजनक गोष्टी प्रकाशित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर हे प्रकरण प्रकाशझोतात आलं असून त्यावरून राजकारण केलं जात असल्याचा आरोप होत होता.

First published: January 14, 2018, 6:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading