सुमित सोनवणे, दौंड(पुणे), 29 जानेवारी : एकीकडे बीडमध्ये लाच घेताना नायब तहसीलदाराला पोलिसांनी अटक केली असताना लाचखोरीचा दुसरा प्रकार समोर आला आहे. दौंडमधील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला ठेकेदारामार्फत 30 हजारांची लाच घेताना पकडण्यात आलं आहे.
उद्योगाच्या वापरासाठी मीटरची पुन्हा जोडणी करून जास्त बिल न पाठवण्याच्या तडजोडीबाबत 60 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून 30 हजार रुपये मध्यस्थामार्फत स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे दौंड कार्यालयातील सहाय्यक अभियंता मिलिंद डोंबाळे आणि महावितरणचा खाजगी ठेकेदार विक्रम पाटणकर यांना ताब्यात घेतलं आहे.
तक्रारदाराने दोन वर्षापूर्वी थ्री फेज कनेक्शन घेतले होते. दोन वर्षानंतर वीज वितरण कंपनीच्या असे लक्षात आले की दिलेले कनेक्शनचे मीटर हे सिंगल फेज आहे. त्यामुळे संबंधित ग्राहकाला जाणारे बिल हे सिंगल फेजचे जात होते. त्यामुळे वीज वितरण कंपनीने त्या ठिकाणचा वीज पुरवठा बंद करून मीटर ताब्यात घेतले. तक्रारदाराने वीज बिल भरून मीटर पुन्हा बसवण्याची मागणी केली. त्यावेळी त्याला पुन्हा वीज मीटर बसून दिले तरी पूर्वीच्या सिंगल फेज आणि थ्री फेज मधील फरकाचे दोन लाख रुपये भरावे लागतील. आता भरलेल्या बिलाने भागणार नाही, असे सांगण्यात आले.
बीडमध्ये लाचखोर तहसीलदाराचा पर्दाफाश, सापळा रचून पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
ही रक्कम न भरण्यासाठी 60 हजार रुपये लाचेची मागणी करून महावितरणचा खाजगी ठेकेदार विक्रम पाटणकर याच्या हस्ते लाचेचा पहिला हप्ता 30 हजार रुपये दौंड शहरातील वीज वितरण कार्यालयात सापळा रचून लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक अधिकारी पोलीस निरीक्षक चंद्रकांत चौधरी, पोलीस शिपाई चिमटे. पोलीस शिपाई राऊत यांनी सहभाग घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.