मालेगाव, 27 नोव्हेंबर : चाहत्या आपल्या लाडक्या अभिनेत्यासाठी काय करतील याचा नेम नाही. त्यातच जर सलमान खानचे (salman khan) चाहते असतील तर विचार करायची सोय नाही. सलमान खानचा अंतिम सिनेमा (anthim movie) रिलीज झाला आहे. मालेगावमध्ये (malegaon) शो सुरू असताना सलमानच्या एंट्रीवर चाहत्यांनी चक्क थिएटरमध्ये फटाके फोडले. हा घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
भाईजान सलमान खानचा सिनेमा मग तो कसाही असला तरी त्याच्या चाहत्यांसाठी पर्वणी असते. सलमानचा सिनेमा कधी रिलीज होणार याची त्याचे चाहते उत्सुकतेनं वाट पाहत असतात. आणि ते भाईजानसाठी काहीही करायला तयार असतात. कधीकधी या चाहत्यांना आवरणं आवाक्याबाहेरचं होऊन जातं. मालेगावातील सुभाष सिनेमागृहात हा प्रकार घडला आहे. कोरोनाच्या महामारीमुळे सिनेमागृह बंद होती. कोरोनाची लाट ओसरल्यामुळे सिनेमागृह सुरू झाले आहे, त्यामुळे सिनेमा रसिकांनी पावलं पुन्हा थिएटरकडे वळाली आहे.
सलमान खानच्या चाहत्यांचा कहर, मालेगावातील सुभाष सिनेमा गृहात फोडले फटाके @BeingSalmanKhan pic.twitter.com/jw3xHbLIA2
— News18Lokmat (@News18lokmat) November 27, 2021
मालेगावातील सुभाष सिनेमागृहात अंतिम सिनेमा रिलीज झाला आहे. बऱ्याच दिवसांनी सलुभाईचा सिनेमा थिएटरला रिलीज झाल्यामुळे चाहत्यांनी एकच गर्दी केली. सलमानची जेव्हा एंट्री झाली तेव्हा चाहत्यांनी थिएटरमध्ये फटाके फोडले. अचानक फटाके फोडण्यात आल्यामुळे एकच गोंधळ उडाला. इतर प्रेक्षकांनी थिएटरबाहेर धाव घेतली.या प्रकरणी अखेर मालेगाव छावणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधीही याच थिएटरमध्ये असे प्रकार घडले आहे.
वेळीच सावध व्हा; ही खास बातमी रात्री उशिरापर्यंत मोबाइल स्क्रीन पाहणाऱ्यांसाठी
फेब्रुवारी महिन्यात शहरातील सेंट्रल चित्रपटगृहात 'करण अर्जुन' चित्रपट लागला होता. चित्रपट सुरू झाल्यावर शाहरुख व सलमान यांची एंट्री होताच त्यांच्या काही चाहत्यांनी अचानक फटाके फोडण्यास सुरुवात केली.
विकेंडनंतर राज्यात पुन्हा पावसाचं कमबॅक; पुण्यासह या जिल्ह्यांना IMD कडून इशारा
सुतळी बॉम्बसह हवेत उडणारे फटाके फोडल्याने काही प्रेक्षकांची धावपळ उडाली. फटाके फोडले जात असताना काहींनी ही हुल्लडबाजी आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद करून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. व्हिडीओ व्हायरल होताच अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी चौकशी आदेश दिले. पोलीस निरीक्षक संजय महाजन यांनी चौकशी करून अज्ञात प्रेक्षकांविरुद्ध भादंवी २८६ व महाराष्ट्र पोलीस कायदा ११२, ११७ नुसार गुन्हा नोंदवला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.