मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान, नैराश्यातून हॉटेलमालकाची गळफास घेऊन आत्महत्या

लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान, नैराश्यातून हॉटेलमालकाची गळफास घेऊन आत्महत्या

संजय नाईक अस आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो मूळचा नागपूरमधील आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. (Symbolic Photo)

संजय नाईक अस आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो मूळचा नागपूरमधील आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. (Symbolic Photo)

Suicide in Beed: बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील एका हॉटेल चालकाने आर्थिक नैराश्यातून आत्महत्या (Hotel owner suicide) केली आहे.

  • Published by:  News18 Desk

माजलगाव, 08 जून: कोरोना विषाणूचा (Corona virus) उद्भाव झाल्यापासून जगातील बहुतांशी देशांच्या अर्थव्यवस्थेपासून सामान्य नागरिकांच्या स्वयंपाक घरातील अर्थिक बजेटपर्यंत सर्वकाही कोलमडलं आहे. कोरोना लॉकडाऊनच्या (Corona lockdown) काळात देशातील असंख्य लोकांच्या नोकऱ्या (Many people lost jobs) गेल्या आहेत. तर अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. परिणामी घराचं, व्यवसायाच्या ठिकाणाचं भाडं देणंही लोकांना कठीण (Not able to pay rent) जात आहे. त्यामुळे बेरोजगारी (Unemployment) आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अनेकजण आत्महत्या करत आहेत. दररोज देशाच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यातून आत्महत्येच्या (Suicide) घटना समोर येत आहेत.

लॉकडाऊनला कंटाळून आत्महत्या केलेल्यांच्या यादीत आणखी एक भर पडली आहे. बीड (Beed) जिल्ह्यातील माजलगाव येथील एका हॉटेल चालकाने आर्थिक नैराश्यातून आत्महत्या (Hotel owner suicide) केली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद ठेवावं लागलं. त्यामुळे कुटुंबीयांचा उदरनिर्वाह कसा करायचा? आणि हॉटेलचं भाडं कसं द्यायचं या चिंतेतून नैराश्यात गेलेल्या हॉटेल चालकाने हॉटेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा-स्टार्टर सुरू करताच मोटारीने घेतला पेट; सांगलीत भाजीविक्रेत्याचा होरपळून मृत्यू

सुरेश तुकाराम सुपेकर असं आत्महत्या केलेल्या हॉटेलचालकाचं नाव असून ते बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील रहिवासी आहेत. मृत सुपेकर मागील 20 वर्षापासून भाड्याच्या जागेत हॉटेल व्यवसाय करतात. पण लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाल्याने त्यांच्यावर कर्जाचं ओझं वाढत होतं. यातूनच आर्थिक नैराश्यात सापडलेल्या सुपेकर यांनी सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास हॉटेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

First published:

Tags: Beed, Crime news, Lockdown, Suicide