मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बाळासाहेबांच्या 'सावली'नेही सोडली उद्धव ठाकरेंची साथ, चंपासिंग थापा शिंदे गटात

बाळासाहेबांच्या 'सावली'नेही सोडली उद्धव ठाकरेंची साथ, चंपासिंग थापा शिंदे गटात

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखी एक धक्का दिला आहे. बाळसाहेब ठाकरेंची सावली म्हणून ज्याची ओळख होती, त्या चंपासिंग थापाने शिंदे गटात प्रवेश केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Thane, India
  • Published by:  Shreyas

ठाणे, 26 सप्टेंबर : उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखी एक धक्का दिला आहे. बाळसाहेब ठाकरेंची सावली म्हणून ज्याची ओळख होती, त्या चंपासिंग थापाने शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाण्यामध्ये चंपासिंग थापाचा शिंदे गटात प्रवेश केला आहे. चंपासिंग थापा हे कित्येक वर्ष बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू म्हणून काम पाहत होते.

चंपासिंग थापासोबतच बाळासाहेब ठाकरे यांचे आणखी एक निकटवर्तीय मोरेश्वर राजे यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. तुम्ही बाळासाहेबांचे विचार घेवून पुढे जात आहात, म्हणून थापा माझ्या सोबत आलेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

कोण आहेत चंपासिंग थापा?

चंपासिंग थापा 30 वर्षांपूर्वी नेपाळहून भारतात आले. मुंबईच्या गोरेगावमध्ये राहून त्यांनी पोटापाण्यासाठी छोटी-मोठी कामं करायला सुरूवात केली. भांडूपचे नगरसेवक के.टी.थापा यांच्या ओळखीने चंपासिंग थापा यांना मातोश्रीवर प्रवेश मिळाला आणि काही काळातच थापा बाळासाहेबांचा लाडका झाला.

बाळासाहेब ठाकरे यांचं जेवण, औषधांच्या वेळा यासारख्या रोजच्या गोष्टींवर थापा लक्ष ठेवून असायचा. मांसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या निधनानंतर बाळासाहेब आणखीनच हळवे झाले होते, तेव्हा थापाने बाळासाहेबांची जीवापाड काळजी घेतली.

मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीशेजारीच थापाचीही छोटीशी खोली होती. थापाचं कुटुंब नेपाळमध्ये तर दोन मुलं दुबईमध्ये असतात. मुंबईसह महाराष्ट्रात झालेली शिवेसनेची वाढ, भुजबळ, राणे यांनी केलेलं बंड तसंच राज ठाकरेंनी सोडलेली साथ असो, या सगळ्या काळात थापा बाळासाहेबांच्या कायमच जवळ राहिला.

First published:

Tags: Cm eknath shinde, Shivsena, Uddhav Thackeray