• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ, उच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल

कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ, उच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल

उच्च न्यायालयात ( High Court) सरकारी पक्षाकडून याचिका दाखल झाल्यामुळे इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

  • Share this:
संगमनेर, 23 जुलै : प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज ( Indorikar Maharaj) यांना वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी संगमनेर सत्र न्यायालयाने (Sangamner Sessions Court) दिलासा दिला होता. पण, आता उच्च न्यायालयात ( High Court) सरकारी पक्षाकडून याचिका दाखल झाल्यामुळे इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील कीर्तन क्षेत्रात ख्यातनाम असलेले इंदोरीकर महाराज वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आले होते. पुत्र प्राप्तीसंदर्भात किर्तनात केलेल्या वक्तव्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संगमनेरच्या दिवाणी न्यायालयात गुन्हा दाखल केला होता. या विरोधात इंदोरीकर महाराजांनी संगमनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. गेली काही महिने सरकारपक्ष आणि अंधश्रद्धा निर्मूलन समीतीने इंदोरीकर कसे दोषी आहेत ही बाजू मांडली होती. मात्र इंदोरीकर यांच्या वकिलांचे म्हणणे रास्त ठरवत जिल्हा न्यायालयाने इंदोरीकर महाराजांना निर्दोष मुक्त केलं होतं. महिन्याभरात प्रियंका चोप्राने मुंबईतील 2 प्रॉपर्टी विकल्या; लाखो रुपयांना ऑफिसही इंदोरीकर महाराज यांचे वक्तव्य पीसीपीएनडीटी एक्ट नुसार गुन्हा असल्याची बाजू सरकार आणि अनिसच्या वतीने मांडण्यात आली मात्र इंदोरीकर महाराज यांनी केलेलं वक्तव्य कोणतीही जाहिरात नव्हती त्यास ग्रंथाचा आधार होता, हे ग्राह्य धरत कोर्टाने इंदोरीकर महाराजांच्या बाजूने निकाल दिला होता. 'आमची लढाई कोणा व्यक्ती विरोधात नसून प्रवृत्ती विरोधात आहे. अशा प्रवृत्तीना वेळीच पायबंद घालायला हवा, असं म्हणत निर्णयाविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हायकोर्टात धाव घेतली होती. Captain India:कार्तिक आर्यनने केली नव्या चित्रपटाची घोषणा; अभिनेता बनणार पायलट आता त्या पाठोपाठ सरकारी पक्षाच्या वतीनेही जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्णयाला औरंगाबाद हायकोर्टात आव्हान दिले गेले आहे. गुरूवारी सरकारी पक्षाच्या वतीने खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. आता हायकोर्टात पुन्हा एकदा इंदोरीकर महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर खल होणार असून हायकोर्ट आता इंदोरीकर महाराजांना दिलासा देणार की दोषी ठरवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Published by:sachin Salve
First published: