मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये आणखी एका हत्तीचा मृत्यू, वर्षभरातली तिसरी घटना

कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये आणखी एका हत्तीचा मृत्यू, वर्षभरातली तिसरी घटना

या हत्ती कॅपमध्ये 2019 ला मकर संक्रांतीच्या दिवशी जन्मलेल्या अर्जुन या हत्तीचा आज दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी 29 जून रोजी आदित्य या हत्तीचा मृत्यू झाल्यानंतर 3 ऑगस्ट रोजी एका हत्तीचा मृत्यू झाला.

या हत्ती कॅपमध्ये 2019 ला मकर संक्रांतीच्या दिवशी जन्मलेल्या अर्जुन या हत्तीचा आज दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी 29 जून रोजी आदित्य या हत्तीचा मृत्यू झाल्यानंतर 3 ऑगस्ट रोजी एका हत्तीचा मृत्यू झाला.

या हत्ती कॅपमध्ये 2019 ला मकर संक्रांतीच्या दिवशी जन्मलेल्या अर्जुन या हत्तीचा आज दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी 29 जून रोजी आदित्य या हत्तीचा मृत्यू झाल्यानंतर 3 ऑगस्ट रोजी एका हत्तीचा मृत्यू झाला.

गडचिरोली, 06 ऑगस्ट : गडचिरोली (gadchiroli) जिल्ह्यात कमलापूरच्या (elephant camp kamlapur gadchiroli) प्रसिद्ध शासकीय हत्ती कॅम्पमधील आणखी एका हत्तीचा दुर्दैवी (elephant dead) मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. धक्कादायक म्हणजे, गेल्या वर्षभरात 3 हत्तीचा मृत्यू झाल्याने राज्यातल्या एकमेव शासकीय हत्ती कॅपवर धोक्याचे सावट पसरले आहे.

गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावर रेपनपल्लीपासून 9 किलोमीटर अंतरावर कमलापुर वनपरिक्षेत्र आहे. बांबुसाठीचे कोलामार्का येथील प्रसिद्ध जंगल या भागात आहे. या भागात लाकडांची वाहतूक करण्यासाठी 1962 मध्ये पहिली हत्तीण  बसंतीला  आणण्यात आले होते. नंतर सोबतीला महालिंगा या हत्तीला आणण्यात आले होते. या हत्तीचा परिवार वाढुन हत्तींची संख्या नऊ झाली होती. तर नागझिरा अभयारण्यातून  इथे एका हत्तीला आणण्यात आले होते. गेल्या काही वर्षात या कॅपमध्ये लाकडाची हत्तीमार्फत होणारी वाहतूक बंद झाली होती.

सिंघम बनायची हौस भोवली, हातात पिस्तुल घेऊन व्हिडिओ बनवणारा हवालदार निलंबित

मात्र, कमलापूरच्या प्रसिद्ध अशा तलावाच्या निसर्गरम्य परिसर आणि हत्तीचा कळपाचा या भागातला वावर पाहुन जिल्ह्यासह बाहेरुन हत्ती कॅपमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्याने वनविभागाने या हत्ती कॅपला पर्यटनस्थळ म्हणून विकास करायला सुरुवात केली. मात्र माओवाद्यांचा अशा पद्धतीच्या पर्यटनस्थळाला विरोध असल्याने त्यांनी या ठिकाणी तोडफोड केली होती.वनविभागाकडून या हत्ती कॅपमधील देखभालीसाठी आवश्यक पदांची भरती न झाल्याने त्याचा परिणाम हत्ती कॅप ओसाड दिसू लागला त्यातून या कॅपमधील तीन हत्तींचा गेल्या वर्षभरात मृत्यू झाला आहे.

गेल्या वर्षी 19 जून रोजी मुसळधार पावसानंतर आदित्य नावाचा हत्ती खेळात अडकला होता. त्याला दुसऱ्या दिवशी वन कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले होते. मात्र गाळातून बाहेर निघण्याच्या संघर्षात थकल्याने त्याची अवस्था बिघडली होती. त्याच्यावर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वैद्यकीय पथकाने उपचार केल्यानंतरही त्याचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, बसंती हत्तीणीने जन्म दिलेल्या सई या हत्तीणीचा गेल्या तीन ऑगस्ट रोजी मृत्यू झाला आहे. काही दिवसांपासून ती आजारी असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले होते. मात्र नेमका कोणता आजार या हत्तीणीला झाला हे स्पष्ट होऊ शकले नाही. 3 ऑगस्ट रोजी सुद्धा एका हत्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेला एक आठवडा होण्यापूर्वीच आजची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

Twitter ची पलटी, Dhoni ला पुन्हा मिळाली ब्लू टिक, चाहत्यांच्या भन्नाट रिएक्शन्स

या हत्ती कॅपमध्ये 2019 ला मकर संक्रांतीच्या दिवशी जन्मलेल्या अर्जुन या हत्तीचा आज दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी 29 जून रोजी आदित्य या हत्तीचा मृत्यू झाल्यानंतर 3 ऑगस्ट रोजी एका हत्तीचा मृत्यू झाला. या हत्तीच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, आज अर्जुन या हत्तीच्या मृत्युमुळे वर्षभरात तीन हत्तीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे शासकीय हत्ती कॅम्पचं अस्तित्व धोक्यात आले असून तिथे आता 7 हत्ती उरले आहेत. एका आठवड्यात दोन हत्तीच्या मृत्युमुळे वन्यजीव प्रेमीमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या हत्तीच्या मृत्यु प्रकरणाची चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कमलापूरचे सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे.

First published:
top videos

    Tags: Elephant