मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /लॉकडाऊनचा आणखी एक बळी; कर्जबाजारीपणाला कंटाळून नांदेडमधील शेतकऱ्यानं स्वतःला संपवलं

लॉकडाऊनचा आणखी एक बळी; कर्जबाजारीपणाला कंटाळून नांदेडमधील शेतकऱ्यानं स्वतःला संपवलं

संजय नाईक अस आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो मूळचा नागपूरमधील आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. (Symbolic Photo)

संजय नाईक अस आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो मूळचा नागपूरमधील आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. (Symbolic Photo)

सततच्या नापिकी आणि कर्जबाजारीपणाला (Debt Pressure) कंटाळून नांदेड (Nanded) जिल्ह्याच्या माहूर तालुक्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या (Farmer Suicide) केली आहे.

नांदेड, 04 जून: सततच्या नापिकी आणि कर्जबाजारीपणाला (Debt Pressure) कंटाळून नांदेड (Nanded) जिल्ह्याच्या माहूर तालुक्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या (Farmer Suicide) केली आहे. मागील दीड वर्षांपासून राज्यात सातत्याने लॉकडाऊन सुरू आहे. याचा प्रचंड आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. एकीकडे नापिकी आणि कर्जबाजारीपणा असताना लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचं कंबरडं तुटलं आहे, अशा चहुबाजूंनी संकटात सापडल्याने संबंधित शेतकऱ्याने आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

संबंधित आत्महत्या केलेल्या 40 वर्षीय शेतकऱ्याचं नाव संतोष माधव कुडमते असून ते माहूर तालुक्यातील रुपला नाईक तांड्यावर राहतात. खरंतर माहूर तालुका हा आदिवासी आणि डोंगराळ भाग आहे. येथील बहुतांशी लोकं केवळ शेती व्यावसायावर अवलंबून आहेत. पण येथील शेतकऱ्यांना मागील काही वर्षांपासून सातत्याने दुष्काळ आणि नापिकीने ग्रासलं आहे. त्यामुळे पीककर्ज फेडता येईल एवढंही उत्पादन होतं नाही. ही संकटं कमी होती म्हणून की काय मागील दीड वर्षांपासून कोरोना विषाणूच्या नवीन संकटाचीही यामध्ये भर पडली आहे.

कोरोना विषाणूमुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने राज्यातील अनेक शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनत असताना डोक्यावरील कर्जाचं ओझं कसं कमी करायचं ? याची चिंताही शेतकऱ्यांना सतावत आहे. अशाच दुष्टचक्रात सापडलेले शेतकरी संतोष कुडमते यांनी गुरुवारी आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

हे ही वाचा-कोपरगावात हुंडाबळी; पीडितेच्या पतीसह चौघांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मृत शेतकरी संतोष कुडमते गुरुवारी सकाळी घरच्यांना काहीही न सांगता घराबाहेर पडले होते. बराच वेळ झाला तरी कुडमते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांची शोधशोध सुरू केली. यावेळी कुडमते यांचा मृतदेह शेतातील एका झाडाला आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. याप्रकरणी माहूर पोलिसांत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

First published:
top videos

    Tags: Farmer, Nanded, Suicide