हृदयविकाराच्या झटक्यामुळे गिर्यारोहकाचा मृत्यू, डोंबिवलीकर तरुणाचा करुण अंत

हृदयविकाराच्या झटक्यामुळे गिर्यारोहकाचा मृत्यू, डोंबिवलीकर तरुणाचा करुण अंत

डोंबिवलीत राहणारे कृष्णा मनोहर पार्टे (३५) हे एका ग्रुपसह जांभुळपाडा नजीकच्या अनघाई किल्ल्यावर ट्रेकिंग करण्यासाठी आले होते.

  • Share this:

मोहन जाधव, प्रतिनिधी

रायगड, 21 जानेवारी :  सुधागड जांभुळपाडा येथील अनघाई किल्यावर हृदयविकाराचा झटका आल्याने तरुण गिर्यारोहकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.  कृष्णा मनोहर पार्टे (३५) रा. डोंबिवली असं मयताचं नाव आहे.

सुधागड तालुक्यातील गड किल्ले हे पर्यटक आणि गिर्यारोहकांसाठी पर्यटनस्थळ, ट्रेकिंग करिता आकर्षण आणि केंद्रबिंदू ठरत आहेत. त्यामुळे मुंबई, पुण्यासह कोकण, महाराष्ट्रातील अनेक गिर्यारोहक आपल्या सहकाऱ्यांसह या गड-किल्ल्यांवर दिसून येतात. यामध्ये लहान मुले, महिला आणि वृद्धांचा देखील सहभाग दिसून येतात.

डोंबिवलीत राहणारे कृष्णा मनोहर पार्टे (३५) हे गेल्या आठवड्यात एका ग्रुपसह जांभुळपाडा नजीकच्या अनघाई किल्ल्यावर ट्रेकिंग करण्यासाठी आले होते. तेव्हा काही काळानंतर कृष्णा पार्टे हे बेशुद्ध अवस्थेत असलेले त्यांच्या सहकाऱ्याच्या लक्षात आले. त्यानंतर वेळ न घालवता डॉक्टर, कृष्णाचे नातेवाईक व राहुल मेश्राम हे कृष्णाला ऍम्ब्युलन्समध्ये घेऊन हॉस्पिटलसाठी रवाना झाले. पण दुर्दैवाने जांभुळपाडा येथील आरोग्य केंद्र बंद होते व परळी गावातील प्रायव्हेट डॉक्टर तपासणीसाठी तयार नव्हते. शेवटी खोपोली येथे नेल्यास म्युनिसिपल हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी तपासणीनंतर कृष्णा पार्टे यास मृत घोषित केले. खोपोली पोलिसांनी तपासणी करून शव पोस्टमार्टमसाठी ग्रामीण रुग्णालय चौक येथे रात्री पाठवले. यामध्ये प्राथमिक रिपोर्टनुसार कृष्णा पार्टेचे निधन हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाले असल्याचे समजले आहे.

गिर्यारोहक अरुण सावंत यांचा रॅपलिंग करताना मृत्यू

दरम्यान, 19 जानेवारी रोजी सह्याद्रीची घोरपड म्हणून प्रसिद्ध असलेले गिर्यारोहक अरुण सावंत यांचा हरिश्चंद्र गड परिसरात रॅपलिंग दरम्यान अपघाती मृत्यू झाला. गेल्या 35 वर्षांहून अधिक काळ सह्याद्रीच्या कड्याकपारीत गिर्यारोहकांना वाट दाखवणारे निष्णात गिर्यारोहक म्हणून प्रसिद्ध होते.

महाराष्ट्राचे नावाजलेले ट्रेकर अरूण सावंत यांचा कोकणकड्यावरून रॅपलिंग करत असताना दरीत पडून मृत्यू झाला. शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हरिश्चंद्र गडाच्या कोकणकड्याहून माकडनाळकडे चढाई करत असताना अरूण सावंत हे साडे पाचशेहून फूट खाली दगडावर कोसळले आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यांना बाहेर आणण्यासाठी पुणे पनवेल आणि लोणावळाच्या रेसक्यू टीम प्रयत्न करत आहेत.

महाराष्ट्राच्या डोंगरदऱ्यात गिर्यारोहकांना सुरक्षित वाट दाखवणारे अरूण सावंत यांच्या मृत्यूमुळे  गिर्यारोहकांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ  ज्या सह्याद्रीच्या कड्याकपारीत पायवाट शोधली, तिथचं त्यांना मृत्यूनं गाठलं.

शनिवारी सकाळी अरुण सावंत आपल्या टीमसह हरिश्चंद्र गड परिसरात रॅपलिंगसाठी आले होते. विशेष, म्हणजे या मोहिमेचे ते  नेतृत्व करत होते. माकडनाळ कड्यावर रोप बोल्ट तयार करीत असताना असताना ते साडेपाचशे फूट खोल दरीत कोसळे आणि जागेवरच त्यांचा मृत्यू झाला.

अरुण सावंत महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी गिर्यारोहक म्हणून प्रसिद्ध होते. गेली 35 वर्षांहून अधिक काळ त्यांना गिर्यारोहणाचा अनुभव होता. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये त्यांनी गिर्यारोहकांसाठी अनेक सुरक्षित वाटा शोधल्या होत्या. लोणावळ्यातील 'ड्यूक्स नोज'ची मोहीम फत्ते करणारा पहिला गिर्यारोहक म्हणूनही त्यांची ख्याती होती.

नवख्या गिर्यारोहकांचे मार्गदर्शक होते. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांची त्यांना खडान‌्खडा माहिती होती. सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील सांधण व्हॅली, कोकणकडा रॅपलिंग, थिटबी वॉटरफॉल रॅपलिंग यासारख्या रॅपलिंगच्या जागा त्यांनी शोधल्या. अनेक कड्यांवर त्यांनी केलेल्या बोल्टिंगचा आधार घेऊन गिर्यारोहक चढाई करतात. अरूण सावंत यांच्या अपघाती निधनानं गिर्यारोहकांनी एक निष्णांत वाटाड्या कायमचा गमावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 21, 2020 09:29 PM IST

ताज्या बातम्या