मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; कथित बंगलो प्रकरणात गुन्हा दाखल, अडचणी वाढणार?

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; कथित बंगलो प्रकरणात गुन्हा दाखल, अडचणी वाढणार?

उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे कुटुंबीयांच्या कथित 19 बंगलो घोटाळाप्रकरणात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Raigad, India

24 फेब्रुवारी, रायगड, मोहन जाधव :  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे कुटुंबीयांच्या कथित 19 बंगलो घोटाळाप्रकरणात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी हा गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तत्कालीन ग्रामसेवकाचा देखील समावेश आहे.

 काय आहे नेमकं प्रकरण? 

उद्धव ठाकरे कुटुंबीयांच्या कथित 19 बंगलो घोटाळाप्रकरणात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या प्रकरणात सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये तत्कालीन ग्रामसेवक विनोद मिंडे,  देवंगणा वेटकोळी, वेदिका म्हात्रे, तत्कालीन सरपंच गोविंद वाघमारे, रेश्मा मिसाळ, रिमा पिटकर, प्रशांत मिसाळ यांचा समावेश आहे. तत्कालीन ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी वेळोवेळी शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने कर आकारणी प्रक्रियेचा जाणीवपुर्वक अंमल केला नाही. तसेच ग्रामपंचायतीच्या मिळकत नोंदवहीमध्ये बेकायदेशीर नोंदी घेऊन खोटे दस्ताऐवज तयार केल्या प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ? 

एफआयआर क्रमांक 26 नुसार, आयपीसी कलम 420, 465, 466, 468 आणि 34 प्रमाणे मुरुडच्या ग्रामविकास अधिकारी  संगिता भांगरे यांनी हा गुन्हा नोंदवला आहे. दरम्या या प्रकरणात आता गुन्हा दाखल झाल्यानं उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण उचलून धरले होते, या प्रकरणात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. आता या प्रकरणात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published:
top videos

    Tags: BJP, Kirit Somaiya, Raigad, Shiv sena, Uddhav Thackeray