शिवसेनेसह ठाण्यातील आणखी काही बडे नेते EDच्या रडारवर? धाडसत्रानंतर राज्यभरात चर्चेला उधाण

शिवसेनेसह ठाण्यातील आणखी काही बडे नेते EDच्या रडारवर? धाडसत्रानंतर राज्यभरात चर्चेला उधाण

ईडीच्या रडारवर ठाण्यातील शिवसेनेचे आणखी एक बडे नेते आहेत. ज्यांच्या खासम खास माणसावर ईडीने धाड टाकली आहे

  • Share this:

ठाणे, 2 डिसेंबर: राज्यातील ठाणे जिल्हा हा सर्वाधिक आमदार असाणारा जिल्हा आहे. पालघर जिल्हा वेगळा झाला असला तरीही राजकीय दृष्ट्या तो भाग अजूनही ठाणे जिल्ह्यातच मोडतो. कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि पक्षांच्या महत्त्वाच्या पदावर ठाणे जिल्ह्यातील व्यक्ती असतेच असते. राज्यातील सत्तेचे समीकरण बदलू शकतो, इतकी राजकीय ताकद या ठाणे जिल्ह्यात आहे. याच ठाणे जिल्ह्याची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरु आहे कारण ठाण्यात केंद्रीय तपास यंत्रणांनी धाडींच सत्र सुरु केलं आहे.

शिवसेना आमदार आणि ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योगपती प्रताप सरनाईक यांच्यावर अंमलबजावणी संचनालयानं (ED) धाड टाकली आणि एक साधा रिक्षावाला नवकोट नारायण कसा झाला? या चर्चेला संपूर्ण ठाणेच नाही तर राज्यभरात उधाण आलं आहे.

हेही वाचा...भाजप खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांचेविरुद्ध पंढरपूरात गुन्हा, ठेवला 'हा' ठपका

मुंबई ईडीच्या मुंबई कार्यालयातून 5 टीम अचामक पडल्या बाहेर...

मिळालेल्या माहितीनुसार इडीच्या या 5 टीम ठाण्याच्या दिशेने रवाना झाल्या होत्या. पण या पाच टीम ठाण्यात कुठे गेल्या? कोणावर यांनी धाडी टाकल्या? धाडी टाकण्या मागचे कारण काय? या सर्व बाबात ईडीने कमालीची गुप्तात पाळली होती. तर या धाडी पडताच ईडीच्या रडारवर ठाण्यातील शिवसेनेचे आणखी एक बडे नेते आहेत. ज्यांच्या खासम खास माणसावर ईडीने धाड टाकली आहे, या चर्चांना उधाण आलं आहे. काही अंशी ही गोष्ट खरी जरी असली तरीही ईडीनं मात्र याबाबत चकर शब्दही काढला नाही आहे. मात्र त्या व्यक्तीच्या घरी आणि कार्यालयात नेमकं काय सापडलं ते इडीने अजून जाहीर केले नाही आहे. पण त्या उद्योगपतीच्या घरी इडीने धाड टाकल्याने ठाण्यातील शिवसैनिकांमध्ये कमालीची खलबतं होवू लागली आहेत. हे मात्र नक्की. ते शिवसेनेचे बडे नेते कोण आहेत? अशी चर्चा आता राज्यभर होत आहे. तर येणाऱ्या दिवसांमध्ये शिवसेनेतील आणि महाविकास आघाडीतील अजून काही नेते ईडीच्या रडारवर असण्याची शक्यता आहे. ज्यामुळे सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीला कोंडीत धरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांन कडून वारंवार केला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात अजून काही महत्त्वाच्या नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, गेल्या आठवड्यात प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्याला व ईडीनं सर्च ऑपरेशन केलं. सरनाईक यांचे चिरंजिव विहंग सरनाईक यांची तब्बल पाच तास चौकशी करण्यात आली. तर प्रताप सरनाईक यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं आहेत.

टॉप्स सिक्युरिटी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडी कडूनही कारवाई करण्यात आली आहे. याचं प्रकरणी विहंग सरनाईकची ईडीने पाच तास चौकशी केली. यानंतर विहंग सरनाईक आणि प्रताप सरनाईक दोघांना इडीने चौकशीसाठी बोलावलं मात्र सरनाईक परिवाराचे खास आणि बिझनेस पार्टनर अमित चंडोळे यांच्या अटकेमुळेनंतर प्रताप सरनाईक यांनी ईडीसमोर चौकशीकरता हजर राहण्यासाठी एक आठवड्याची मुदत मागितली. कारण काय तर प्रताप सरनाईक हे राज्याबाहेरुन आल्याने त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या नियमानुसार क्वारनटाईन व्हावं लागणार आहे. तशी नोटीस बीएमसीनं त्यांना धाडली आहे, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं.

दुसरीकडे, ईडीनं टाकलेल्या धाडी आणि प्रसारमाध्यमांमध्ये सुरु असलेल्या बातम्यांमुळे विहंग सरनाईक यांची पत्नी डॉ. अनाहिता सरनाईक यांना मानसिक धक्का बसला असून त्यांना चक्कर येणे, उलट्या, जुलाब आणि अशक्तपणासारखे आजार झाल्याने त्यांना ठाण्याच्या ज्युपिटरमध्ये दाखल केलं आहे. या दोन कारणास्तव प्रताप सरनाईक यांनी विहंग आणि स्वत: करता ईडीकडून 1 आठवड्याची वेळ मागितली होती. तर ईडी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रताप सरनाईक क्वारनटाईन असल्याने त्यांना चौकशी करता हजर न राहण्याची मुभा 2 डिसेंबरपर्यंत दिली होती. 3 डिसेंबर म्हणजे गुरुवारी आमदार प्रताप सरनाईक यांना चौकशीकरता हजर रहावं लागणार आहे. तर विहंग सरनाईक यांना देखील चौकशीला करता कोणतीही मुभा न देता तब्बल 4 वेळा ईडीनं विहंगला चौकशीकरता हजर राहण्याकरता समन्स धाडले आहेत.

हेही वाचा...ठाकरे सरकार घेणार आणखी एक महत्त्वाचा निर्णय, जातीवाचक नावं हद्दपार होणार

विहंग चौकशीला हजर राहिले नाही तर त्याच्यावर कारवाई करण्यास अंमलबजावणी संचनालयाला म्हणजेच ईडीचे मार्ग मोकळे आहेत असं इडी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. एकदंर प्रकरण आणि ईडीच्या हालचाली पाहता या प्रकरणात सरनाईक कुटुंबीयांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार असच दिसत आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 2, 2020, 8:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading