Home /News /maharashtra /

भाजपला दुसरा मोठा धक्का, नगरसेवकाने शिवसेनेशी हातमिळवणी करून मिळवलं सभापती पद

भाजपला दुसरा मोठा धक्का, नगरसेवकाने शिवसेनेशी हातमिळवणी करून मिळवलं सभापती पद

शिवसेनेने केलेल्या राजकीय खेळीमुळे महापालिकेत बहुमत असलेल्या भाजपच्या हातून वर्षभराच्या काळात महापौर पदानंतर स्थायी समिती पदही गमावण्याची नामुष्की आली आहे.

उल्हासनगर 29 ऑक्टोबर: उल्हासनगर महापलिकेत बहुमत असून सुद्धा भाजपला पराभव पत्करावा लागला. धक्कादायक म्हणजे भाजपच्या नगरसेवकाने पक्षालाच धोका देत शिवसेनेच्या मदतीने स्वतःच्या गळ्यात स्थायी समितीच्या सभापतीपदाची माळ गळ्यात घालून घेतली त्यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. उल्हासनगर महापालिकेत गुरुवारी ऑनलाईन महासभेत ही निवडणूक पार पडली. भाजप नगरसेवक असलेल्या आणि पक्षाशी बंडखोरी केलेल्या विजय पाटील यांना 8 तर भाजपाच्या अधिकृत उमेदवार जया माखीजा यांना 7 मते मिळाल्याने भाजप बंडखोर पाटील यांचा विजय झाला. शिवसेनेने केलेल्या राजकीय खेळीमुळे महापालिकेत बहुमत असलेल्या भाजपच्या हातून वर्षभराच्या काळात महापौर पदानंतर स्थायी समिती पदही गमावण्याची नामुष्की आली आहे. तर चारही प्रभाग समित्यांवर महिला राज आले असून भाजपाच्या वाट्याला तीन तर काँग्रेसच्या वाट्याला एक प्रभाग समिती आली आहे. एकूण 16 सदस्य असलेल्या या समितीत भाजपाचे 9 तर शिवसेना आणि काँग्रेस, रिपाई मित्र पक्षाचे मिळून 7 सदस्य होते. त्यामुळे भाजपला या निवडणुकीत विजयाचा आत्मविश्वास होता. मात्र सभापती पदासाठी भाजपकडून दोन सदस्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र याचवेळी भाजपचे नगरसेवक विजय पाटील यांनी पक्षांशी बंडखोरी करत शिवसेनेच्या पाठिंब्याने स्थायी समिती सभापती पदासाठी अर्ज दाखल केला. त्यामुळे भाजपाला धक्का बसला ही घटना ताजी असतांना आणि निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर स्थायी सदस्य डॉ.प्रकाश नाथांनी यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि स्थानिक शिवसेना नेत्यांच्या राजकीय खेळीमुळे अवघ्या दोन दिवसात बहुमतात असलेली भाजपा अल्प मतात गेली. तर गुरुवारी दुपारी पीठासीन अधिकारी असलेले जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या उपस्थितीत ऑनलाइन महासभा आणि निवडणूक पार पडली.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: BJP, Shivsena

पुढील बातम्या