मुंबई, 29 नोव्हेंबर : मुंबईमध्ये गोवरच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतच चालली आहे. मुंबईमध्ये सोमवारी आणखी एका 1 वर्षांच्या मुलीचा गोवरने मृत्यू झाला आहे. हा मृत्यू संशयित असला तरी आतापर्यंत गोवरने मृत्यू झालेल्या बालकांची संख्या 14 वर पोहोचली आहे. तर मालेगाव आणि नाशिकमध्येही रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
अंधेरी येथे राहणाऱ्या एक वर्षांच्या मुलीला 26 नोव्हेंबर रोजी ताप आणि पुरळ येऊन श्वसनाचा त्रास झाल्याने महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सोमवारी या एका वर्षीचा मुलीचा मृत्यू झाला. मुंबईतील गोवरने मृत्यू झालेल्या बालकांची संख्या 11 असून, त्यातील तीन मृत्यू संशयित आहेत.
तर मुंबईबाहेरील तीन बालकांचा गोवरने मृत्यू झाला आहे. सोमवारी मुंबईमध्ये गोवरचे आणखी 11 रुग्ण आढळले आहे. गोवरच्या रुग्णांची संख्या 303 वर पोहोचली आहे.
(ही व्हिटॅमिन कमी पडत असतील तर चेहरा कमी वयातच वयस्क दिसू लागतो)
तर गोवरचे 115 संशयित रुग्ण आढळले आहे. संशयित रुग्णांची संख्या 4 हजार 62 पोहोचली आहे.
मालेगावात गोवरच्या रुग्णांची संख्या 62 वर
(डायबिटिजसोबत अनेक त्रासांपासून मिळेल आराम, फक्त दुधात मिसळून प्या हा पदार्थ)
दरम्यान, मालेगाव शहरात गोवरचे आणखी 6 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या 62 वर पोहोचली आहे. 4 संशयित रुग्णावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोवरचे जे रुग्ण आढळून आले त्यांनी लस घेतलेली नव्हती. गोवरचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी महानगर पालिका प्रशासना तर्फे वार्डा-वार्डात जाऊन लसीकरणासोबत जनजागृती देखील केली जात आहे. कोरोना प्रमाणे मालेगाव शहर गोवरचा हॉट स्पॉट होऊ नये यासाठी प्रशासन पूर्ण प्रयत्न करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra News, Mumbai