मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणाचा प्रश्न सुटला, नव्या पालकमंत्र्यांची 2 दिवसांत घोषणा?

स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणाचा प्रश्न सुटला, नव्या पालकमंत्र्यांची 2 दिवसांत घोषणा?

राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसल्यामुळे पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार की नाही अशी शक्यता निर्माण झाली होती. पण

राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसल्यामुळे पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार की नाही अशी शक्यता निर्माण झाली होती. पण

राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसल्यामुळे पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार की नाही अशी शक्यता निर्माण झाली होती. पण

मुंबई, 10 ऑगस्ट : कधी होणार...कधी होणार...म्हणत अखेरीस दीड महिन्यानंतर शिंदे सरकारच्या (state government) मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. एकूण 18 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजून खातेवाटप झाले नसले तरी पालकमंत्र्यांच्या नावाची दोन दिवसांमध्ये घोषणा होणार आहे. याबद्दल आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे. शिंदे सरकाराचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार अखेरीस कही खुशी कही गम वातावरणात पार पडला. एकूण 18 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. भाजप आणि शिंदे गटातून प्रत्येकी ९ जणांना मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. देशभरात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रत्येक घरात तिरंगा ही मोहिम राबवली जात आहे. पण, राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसल्यामुळे पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार की नाही अशी शक्यता निर्माण झाली होती. पण आता येत्या दोन दिवसात पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा होणार आहे. आज नव्या मंत्र्यांसह मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आजच्या कॅबिनेट बैठकीनंतर यासंदर्भात चर्चा होणार आहे. नवे मंत्री आपल्या जिल्ह्यात ध्वजारोहण करणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. कोणाला मंत्रिपदं शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, विजयकुमार गावित, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा आणि सुरेश खाडे या भाजपच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर शिंदेंकडून संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, उदय सामंत, संजय राठोड, दीपक केसरकर, दादा भुसे आणि तानाजी सावंत यांची मंत्रिपदावर वर्णी लागली आहे. आता या सर्व मंत्र्यांना कोण-कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिले जाणार आहे, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. संभाव्य खातेवाटप एकनाथ शिंदे - मुख्यमंत्री (नगरविकास) देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री) गृह आणि अर्थ राधाकृष्ण विखे पाटील - सहकार सुधीर मुनगंटीवार - ऊर्जा, वन चंद्रकांतदादा पाटील - महसूल, सार्वजनिक बांधकाम विजय कुमार गावित- आदिवासी विकास गिरीश महाजन - जलसंपदा गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा दादा भुसे- कृषी संजय राठोड- ग्राम विकास सुरेश खाडे - सामाजिक न्याय संदीपान भुंभरे- रोजगार हमी उदय सामंत - उद्योग तानाजी सावंत- उच्च तंत्र शिक्षण मंत्री रवींद्र चव्हाण- गृह निर्माण अब्दुल सत्तार- अल्पसंख्यांक विकास दीपक केसरकर- पर्यटन आणि पर्यावरण अतुल सावे - आरोग्य शंभूराज देसाई- उत्पादन शुल्क मंगलप्रभात लोढा- विधी न्याय
First published:

पुढील बातम्या