Home /News /maharashtra /

अंदाज आला आहे, दोन दिवसांत मदतीची घोषणा, मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

अंदाज आला आहे, दोन दिवसांत मदतीची घोषणा, मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उस्मानाबादमधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करत आहे.

    उस्मानाबाद, 21 ऑक्टोबर : अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उस्मानाबादच्या दौऱ्यावर आले आहे. 80 ते 90 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहे, दोन दिवसांत मदतीची घोषणा करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उस्मानाबादमधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करत आहे. तुळजापूरमध्ये काटगाव इथं पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. 'खूप दिवसांनी तुमची भेट घेण्यासाठी आलो आहे. आज मी तुमचा आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहे. जवळपास 80 ते 90 टक्के पंचनामे घेण्यात आले आहे. अंदाज पूर्ण आला आहे.  त्यामुळे उद्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. शेतकऱ्यांचे आयुष्य पुन्हा उभे करण्यासाठी योग्य निर्णय घेऊ' असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. 'परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. आजची परिस्थिती भयानक आहे. मी पाहणी करण्यासाठी आलो म्हणून आकडेवारी जाहीर करणार नाही. जवळपास 80 ते 90 टक्के पंचनामे झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी मदत दिली जाणार आहे. त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. तसंच, शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये धीर धरावा, हे शासन पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून शेतकऱ्यांचे आयुष्य चांगले होईल अशा मदतीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, विभागीय सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन यांच्यासह शेतकरी व काटगाव ग्रामस्थ उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली होती. या पाहणीनंतर पत्रकार परिषद घेतली होती. 'सध्या शेतीचे पंचनामे सुरू आहेत, आढावा घेऊन मदत केली जाणार आहे. तुर्तास मृतांच्या नातेवाईकांना आज प्रातिनिधिक मदत दिली आहे. आतापर्यंत मागील सरकारकडून फक्त घोषणाबाजी करण्यात आली आहे. पण, आम्ही कोणतीही घोषणाबाजी करणार आहे. थेट मदत पुरवणार आहोत. हे संकट अजून टळलेले नाही. येत्या काही दिवस अतिवृष्टी होऊ शकते याचा इशारा वेधशाळेनं दिला आहे. त्यामुळे घाईगडबडीने काही केले जाणार आहे. सर्वांची काळजी घेण्याची गरज आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले होते.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या