Home /News /maharashtra /

अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या, शिवसैनिकानं थेट उद्धव ठाकरेंना लिहिलं रक्तानं पत्र

अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या, शिवसैनिकानं थेट उद्धव ठाकरेंना लिहिलं रक्तानं पत्र

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्नने सन्मानित करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न करावेत

सोलापूर, 26 जुलै: लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्नने सन्मानित करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न करावेत, या मागणीसाठी एका शिवसैनिकानं चक्क रक्तानं पत्र लिहिलं आहे. बार्शीतील राजेंद्र गायकवाड असे शिवसैनिकाचं नाव आहे. हेही वाचा...पुणे हादरलं, बंद घरात आढळले सडलेल्या अवस्थेत वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह अण्णाभाऊ साठे यांचे मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र चळवळीत मोठे योगदान दिलं आहे. त्याचबरोबर त्यांचे साहित्यातील योगदान मोठे आहे. त्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावं. भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च सन्मान आहे. त्यामुळे साहित्य सम्राटअण्णा भाऊसाठे यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा यासाठी केंद्राकडे आपण मागणी करण्याची विनंतीही राजेंद्र गायकवाड यांनी केली आहे. दुसरीकडे, दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी राज्य सरकारकडे एका पत्राद्वारे केली आहे. महाराष्ट्र सरकारने याबाबत केंद्र सरकारकडे शिफारस करावी, असंही या पत्रात म्हटलं आहे. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता एक ऑगस्ट 2020 रोजी होत आहे. साहित्य आणि समाजकारणात अण्णाभाऊ साठे यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. अण्णाभाऊ साठे यांनी वंचित समाजाच्या व्यथा, वेदना त्यांच्या साहित्यकृतीतून अतिशय परिणामकारकरित्या मांडल्या आणि समाजाला न्याय व हक्क मिळवून देण्याचे कार्य त्यांनी केले. विविध समाजघटकांकडून या मागणीबाबत जोर धरण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अण्णाभाऊ साठेंना मरणोत्तर भारतरत्न देण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती भाजपचे आमदार राहुल कुल यांच्याकडून राज्य सरकारला करण्यात आली आहे. हेही वाचा...धक्कादायक! क्वारंटाइन सेंटरमध्ये रुग्णांना दिल्या जात आहे 'एक्सपायर्ड मेडिसिन' दरम्यान, आमदार कुल यांच्यासोबतच बहुजन लोकअभियान या संघटनेनंही अण्णाभाऊ साठे यांचा भारतरत्न देऊन सन्मान करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. 'अण्णाभाऊंनी बारा बलुतेदार आणि बहुजन समाजासह देशातील विविध घटकांसाठी काम केलेलं आहे. यापूर्वीच शासनानं त्यांच्या कामाची दखल घ्यायला हवी होती. आता विविध आमदार आणि खासदार याबाबत पत्र लिहून मागणी करत आहेत. त्यामुळे शासनाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावं,' अशी मागणी बहुजन लोकअभियान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आबा वाघमारे यांनी केली आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Shiv sena, Udhav thackarey

पुढील बातम्या