News18 Lokmat
LIVE NOW

गांधी जयंतीनिमित्त अण्णा हजारे आंदोलनाची घोषणा करण्याची शक्यता

राष्ट्रपतींनी भाषणात साईबाबांचा जन्म परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात झाल्याचा उल्लेख केल्यानं नवीन वादाला तोंड फुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

Lokmat.news18.com | October 11, 2018, 1:57 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated October 11, 2018
auto-refresh

Highlights

दिल्ली, 2 ऑक्टोबर: महात्मा गांधीच्या जयंती निमित्त समाजसेवक अण्णा हजारे सोमवारी सकाळी दिल्लीत राजघाटावर महात्मा गांधी यांच्या प्रेरणास्थळावर जाऊन दर्शन घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकपाल आणि स्वामीनाथन आयोगाकडे दुर्लक्ष केल्याने अण्णा तेथे आंदोलनाची घोषणा करणार आसल्याची शक्यता आहे. अण्णांनी तीन वर्षांपासून पंतप्रधानांना सातत्याने पत्र पाठवत आहेत. आपल्या पत्रातून लोकपाल कायद्याची अंमलबजावणी आणि शेतमालाला हमीभाव मिळावा, यासाठी मागणी केली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून फक्त कारवाई सुरू असल्याचं त्रोटक उत्तर देण्यात येत आहे.  पंतप्रधानांचे भाषण वेगळं आणि कृती वेगळी आहे, अशी टीकाही अण्णांनी सातत्यानं केली आहे. मोदींना गैरप्रकार थांबवायचेच नाहीत, असा अर्थ यातून निघत असल्याचा आरोपही अण्णांनी केला आहे. लोकपाल कायदा पारित व्हावा म्हणून 2011 साली आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या आधी अण्णा हजारे उपोषणाला बसले होते. त्यानंतर लोकपाल संसदेत संमत करण्यात आला.पण त्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही.
1:46 pm (IST)
2:39 pm (IST)
Load More