EXCLUSIVE 82 व्या वर्षी 7-7 दिवस उपोषण करणारे अण्णा हजारे यांच्या फिटनेसचं रहस्य

EXCLUSIVE  82 व्या वर्षी 7-7 दिवस उपोषण करणारे अण्णा हजारे यांच्या फिटनेसचं रहस्य

काहीही न खाता पिता अण्णा हजारे 7-7 दिवस कसे राहू शकतात? उपोषणाची कार्यपद्धती नेमकी या हे स्वतः अण्णांकडून जाणून घेतलं.

  • Share this:

मुंबई, 15 फेब्रुवारी : या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्याच्या शेवटी पुन्हा एकदा अण्णा हजारे यांनी आपलं उपोषणाचं अस्त्र उपसलं आणि लोकपाल, लोकायुक्त नेमणुकीची मागणी रेटून धरली. अण्णा हजारे यांचं वय आहे 82 व्या वर्षाकडे चाललं आहे. या वयात अशी उपोषणं त्यांना झेपतात कशी, 7-7 दिवस पोटात अन्नाचा कण न घेता अण्णा राहू कसं शकतात आणि उपोषणानंतर रीतसर त्याविषयी चर्चाही करू शकतात यामागे त्यांची आरोग्य आणि आहाराची तपश्चर्या. आहारावर संपूर्ण नियंत्रण आणि नियमितता.

वयाच्या 82 व्या वर्षी तब्बल 7 दिवस उपोषण केल्यानंतर अण्णांनी एक दिवस संपूर्ण विश्रांती घेतली आणि उपोषण सोडल्याच्या तिसऱ्या दिवशी न्यूज 18 लोकमतला प्रदीर्घ मुलाखत दिली. एवढी एनर्जी कुठून आणता अण्णा, असा प्रश्न हजारे यांना विचारल्यावर त्यांनी हसत हसत उत्तर दिलं - "आहारावर संपूर्ण नियंत्रण असेल आणि संतुलित आहार असेल तरच हे शक्य आहे."

उपोषणाची तयारी

अण्णा हजारे उपोषणापूर्वी काही दिवस आधीपासूनच त्याची तयारी करतात. उपोषणाच्या दिवसापर्यंत हळूहळू आहार कमी कमी करत नेतात आणि मग उपोषणाला अन्न पूर्ण बंद असतं. उपोषण सोडल्यानंतर लगेच नेहमीचा आहार घेण्याची घाई अण्णा करत नाहीत. हळूहळू आहार वाढवत नेतात. त्यामुळे या वयातही 6-7 दिवसांची उपोषणं अण्णांना सोसतात.

"मी ते बर्गर वगैरे जंक फूड अजिबात खात नाही. आहार साधा असतो. शुद्ध, सात्विक खाल्ल्याने वृत्तीसुद्धा सात्विक बनते. विचार शुद्ध होतात आणि मनही शुद्ध होतं. अशा सात्विक विचारांनीच काहीतरी चांगलं करण्याची प्रेरणा मिळते", अण्णा त्यांच्या तब्येतीचं रहस्य उलगडतात.

अण्णा हजारेंचा आहार कसा असतो, याबाबत अण्णांच्या चळवळीला वाहून घेतलेल्या आणि अण्णांबरोबर गेली दोन दशकं काम करणाऱ्या गुलाबबाई सांगतात. गुलाबबाई राळेगण सिद्धीत अण्णा हजारेंच्या पुढाकाराने सुरू झालेल्या उपक्रमात काम करतात. त्यांच्याकडे स्वयंपाकघराची जबाबदारी असते. राळेगणचं कम्युनिटी किचन त्या सांभाळतात. गुलाबबाई म्हणतात, ''अण्णांचा आहार अगदी साधा असतो. अगदी मोजका. एक भाकरी, भाजी, वरण आणि कधी रात्रीची खिचडी एवढंच अण्णा जेवतात. भाकरीऐवजी कधी फुलका एवढाच काय तो बदल. उपोषणानंतर लगेच जेवण सुरू करत नाहीत. भाज्यांचं सूप मी त्यांना देते", त्या सांगतात.

First published: February 17, 2019, 6:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading