अहमदनगर, 4 मे- सरकार नक्षलवाद्यांशी चर्चा करून मार्ग काढणार असेल तर आपण मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे . ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले आहे. गडचिरोलीत नक्षलवादी हल्ल्यात पोलिसांचे 15 क्यूआरटी जवान शहीद झाले. यावर राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली.
अण्णा म्हणाले, नक्षलवादी काही बाहेरचे नाहीत. त्यांचे प्रश्न समजून घेऊन सरकारने चर्चेतून मार्ग काढायला हवा. हा प्रश्न बंदुकीने सुटणार नाही. सरकार नक्षलवाद्यांशी चर्चेसाठी तयार असेल तर आपण मध्यस्थी करण्यास तयार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांनी कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा आणि लेंढारी गावादरम्यान आयईडी स्फोट घडवून आणला. यात 15 जवान शहीद झाले. नक्षल्यांनी भूसुरुंग लावून हा स्फोट घडवून आणला. सी 60 तुकडीचे हे सर्व जवान होते. ते गस्तीवर निघाले होते. या हल्ल्या खासगी चालकाचा मृत्यू झाला. नक्षलवादी पोलिसांच्या वाहनांना टार्गेट करतात, म्हणून जवान खासगी वाहनातून जात होते.
VIDEO: रोड शोमध्ये तरुणाने अरविंद केजरीवालांच्या श्रीमुखात लगावली