PM मोदी की देवेंद्र फडणवीस? अण्णा हजारेंना 'या' नेत्याचं आवडतं काम

PM मोदी की देवेंद्र फडणवीस? अण्णा हजारेंना 'या' नेत्याचं आवडतं काम

पावसाळी अधिवेशनात हा कायदा मंजूर होईल अशी अपेक्षा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.

  • Share this:

अद्वैत मेहता (प्रतिनिधी)अहमदनगर, 11 जून: लोकपाल आणि लोकायुक्त कायदा होऊन पाच वर्ष झाली. लोकपालची नियुक्ती झाली मात्र लोकायुक्ताची नियुक्ती झालेली नाही. महराष्ट्रात हे देशातील पहिले राज्य आहे, जिथे लोकायुक्त नियुक्ती केली जात आहे. मंगळवारी आणि बुधवारी समितीची पहिली बैठक होणार आहे. या बैठकीला 5 सचिव आणि टीम अण्णा हजारेंसह 5 सदस्य असतील, आजपासून लोकायुक्त कायद्याचा मसुदा कसा असावा यावर चर्चा होणार आहे. येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा कायदा मंजूर होईल अशी अपेक्षा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे. लोकायुक्त कायदा या अधिवेशनात संमत झाला की राज्यातील भ्रष्ट मंत्री घरी जातील असा विश्वास अण्णा हजारेंनी व्यक्त केलाय. तसंच मोदींपेक्षा राज्यातील फडणवीस सरकार उत्तम काम करत असल्याचं कौतूकही अण्णांनी केलं.

First published: June 11, 2019, 12:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading