‘लोकपाल’ असता तर राफेलचं सत्य जनतेपुढे असतं – अण्णा हजारे

‘लोकपाल’ असता तर राफेलचं सत्य जनतेपुढे असतं – अण्णा हजारे

सरकारच्या ‘हम करे सो कायदा’, या भूमिकेमुळे 'राफेल'ची चौकशी होत नाही, असंही अण्णा हजारे म्हणाले.

  • Share this:

अहमदनगर, 4 नोव्हेंबर : ‘लोकपाल कायदा असता तर राफेलचं सत्य जनतेपुढे आलं असतं,’ असं म्हणत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राफेल प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारच्या ‘हम करे सो कायदा’, या भूमिकेमुळे 'राफेल'ची चौकशी होत नाही, असंही अण्णा हजारे म्हणाले.

‘लोकपाल असता तर देशात सीबीआय अंतर्गत आरोप-प्रत्यारोप, राफेलबाबतचं सत्य नक्कीच पुढे आलं असतं. मात्र सरकारला लोकपाल नको आहे. सरकारची याबाबतची भूमिका हम करे सो कायदा, अशी असल्याने सत्य बाहेर येऊ दिले जात नसल्याची खंत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे.

‘राफेलमध्ये भ्रष्टाचार झालाच नाही, असं नाही’

राफेलमध्ये भ्रष्टाचार झालाच नाही, असं म्हणता येणार नाही आणि झाला म्हणावं तर सामान्य जनतेपुढे तसे पुरावे आलेले नाहीत. त्यामुळेच अशा संदिग्ध प्रकरणात लोकपाल असता आणि सामान्य जनतेने मागणी केली असती तरी चौकशी होऊन जनतेसमोर सत्य आलं असतं, असं म्हणत अण्णा हजारे यांनी लोकपालची गरज अधोरेखित केली.

सीबीआय प्रकरणावरूनही सरकारवर हल्ला

सीबीआयमधील वरिष्ठ संचालकांमधील वाद चव्हाट्यावर येणं शोभनीय नसल्याचंही अण्णा म्हणाले. सीबीआयसारख्या संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप-प्रत्यारोप समोर येत असतील तर लोकपालची गरज किती आहे आणि यासाठीच आपण नेहमी आग्रही असल्याचं अण्णा हजारे यांनी सांगितलं.

राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचाही सरकारला दणका

सर्वोच्च न्यायालयानं १० दिवसांत राफेल विमानांच्या किंमतीचे तपशील मागवले आहेत. बंद लिफाफ्यात माहिती देण्याचे आदेश न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. राफेल खरेदी प्रकरणी कोर्टात चार याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. सध्या सीबीआय चौकशीची गरज नसल्याचंही कोर्टानं सांगितलंय. राफेल विमान खरेदी करार प्रकरणावर वाद पेटलेला असताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला झटका दिला. राफेल खरेदी आणि तांत्रिक बाबी तुम्ही सार्वजनिक करू शकत नसाल, पण राफेल खरेदी कराराबाबत प्रक्रियेची माहिती द्यावी असे आदेश न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहे.

 VIDEO: पत्नीचा रोमँटिक डान्स व्हायरल, पतीनेच केला होता शूट

First published: November 4, 2018, 10:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading