• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • 'सकाळी जी भीती व्यक्त केली होती तेच झालं'

'सकाळी जी भीती व्यक्त केली होती तेच झालं'

अण्णांनी हे उपोषण मागे घेतल्यानंतर समाजमाध्यमांतही मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

 • Share this:
  मुंबई, 5 फेब्रुवारी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण अखेर मागे घेण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मागण्या मान्य केल्याचं आश्वासन दिल्यानंतर अण्णांनी उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली. अण्णांनी हे उपोषण मागे घेतल्यानंतर समाजमाध्यमांतही मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या आहेत. 'सकाळी जी भीती व्यक्त केली होती तेच झालं,' असं म्हणत अण्णांच्या आंदोलनात एकेकाळी सक्रिय सहभाग घेणाऱ्या विश्वंभर चौधरी यांनी फेसबुकवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अण्णांच्या उपोषणावर सोशल मीडियावर उमटलेल्या प्रतिक्रिया या संमिश्र स्वरूपाच्या आहेत. न्यूज18 लोकमतने अण्णांनी उपोषण मागे घेतल्याची बातमी फेसबुकवर शेअर केल्यानंतर तिथं वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. या प्रतिक्रिया संमिश्र स्वरुपाच्या असल्याचं पाहायला मिळत आहे. 'अण्णा हे गांधीवादी नेते' मुरलीधर काळे यांनी अण्णा हजारे यांची महत्त्वा सांगत त्यांचं समर्थन करणारी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'गांधीवादाचा अस्त होईल तेव्हा प्रत्येकजण हातात शस्त्र घेऊन समाज हिंसक होईल. सत्तांतर सुध्दा रक्तरंजित असेल. म्हणून गांधीवाद जोपासा .अण्णा हे गांधीवादी नेते आहेत. किती अवहेलना केली सरकारने? हे शेवटचे गांधी आहेत. देश आणि देशातील जनतेसाठी त्यागी जीवन जगनारे," अशी प्रतिक्रिया मुरलीधर काळे या फेसबुक यूजरने व्यक्त केली आहे. 'उपोषण करून काय सिद्ध केलं?' मंगेश पाटील आव्हाळे या फेसबुक यूजरने प्रतिक्रिया देताना अण्णांच्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. 'अण्णा काय साध्य केले उपोषण करून? मागण्या तर मान्य नाही झाल्या. फक्त आश्वासन दिले मुख्यमंत्र्यांनी..तेही नेहमी सारखे....",  असं मंगेश यांना वाटतं. 'आदर द्विगुणित झाला' 'आपल्याबद्दलचा आदर आज द्विगुणित झाला आहे,' असं म्हणत सुधीर शेटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  "अण्णांच्या या सर्व मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत...अण्णा आपल्या सामाजिक सेवेला प्रणाम !आपण आपले जीवन समाजाच्या कल्याणासाठी दिले आहे. आपला आदर आज द्विगुणित झाला आहे." 'या तर भाजपच्या थापा' नीरज यांना वाटतं की निवडणुका जवळ आल्याने भाजपने हे आश्वासन दिलं आहे. संबंधित बातम्या:VIDEO : अण्णांसोबत यशस्वी चर्चा, विलासराव देशमुखांनंतर फडणवीस ठरले दुसरे मुख्यमंत्री!
  First published: