न्यूज18लोकमत इम्पॅक्ट : औरंगाबादमधील अंजली शिंदेला समाजातून मदतीचे हात

न्यूज18लोकमत इम्पॅक्ट : औरंगाबादमधील अंजली शिंदेला समाजातून मदतीचे हात

भाजलेल्या आईची ही चिमुकली गेल्या चार महिन्यापासून काळजी घेतेय. न्यूज18लोकमतच्या बातमीनंतर सामाजिक भावनेतून काही हात अंजलीच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.

  • Share this:

औरंगाबाद, सिद्धार्थ गोदाम, 26 मार्च : आम्ही अंजली शिंदे या चिमुकलीची बातमी दाखवली होती. ती भाजलेल्या आईची कशी काळजी घेते, ती आपल्या आईची आई कशी झाली. न्यूज18 लोकमतने ही बातमी दाखवल्यानंतर त्या चिमुकलीला समाजातून मदतीचे हात पुढे येत आहेत.

जी आपल्या आईची आई झाली ती हीच अंजली शिंदे. भाजलेल्या आईची ही चिमुकली गेल्या चार महिन्यापासून काळजी घेतेय. त्या अंजलीच्या आणि तिच्या दोन भावंडांच्या चेहऱ्यावर आता हसू फुललं आहे.  अं

औरंगाबाद शहरातील महिला अभ्यास केंद्राच्या ग्रुपने अंजलीला काही मदत दिली आहे. कपडे, खेळणे, खाऊ आणि अंथरूण पांघरूण अशा स्वरूपात मदत केली आणि हा ग्रुप अंजलीच्या कुटुंबाच्या मदतीसाठी प्रयत्न करणार आहे.

आपल्या आईच्या काळजीपोटी अंजली आणि तिची भावंडे काळजीत होती. आज त्यांनाही समाजातून आपल्या पाठीशी कुणीतरी उभं आहे, या भावनेनं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय.

औरंगाबादच्या या महिला अभ्यास ग्रुपची मदत तुटपुंजीच आहे. मात्र अंजलीसाठी ती मोलाची आहे. अंजलीने आपल्या आईच्या बाबतीत श्रावनकन्येची भमिका चोख बजावलीय. आता आपली वेळ आहे. अंजलीला मदतीचा हात देण्याची.

First published: March 26, 2018, 5:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading