एकनाथ खडसे बदनामी प्रकरणी अंजली दमानियांना जामीन

एकनाथ खडसे बदनामी प्रकरणी अंजली दमानियांना जामीन

यापुढे खडसेंच्या विरोधातली लढाई आणखी तीव्र करू असा इशाराही अंजली दमानिया यांनी यावेळी दिला.

  • Share this:

जळगाव, 16 एप्रिल : राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि भाजपची बदनामी केल्या प्रकरणी आज रावेर कोर्टात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी हजेरी लावली. कोर्टाने अंजली दमानियांना 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन दिलाय.

रावेरचे तालुका अध्यक्ष सुनील पाटील यांनी अंजली दमानिया यांच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल केला होता. या खटल्यात दमानिया आरोग्यासाठी आणि विविध कारणास्तव गैरहजर राहिल्याने, रावेर न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले होते. अटक वॉरंट जारी झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्या आज रावेर न्यायालयात हजर झाल्या होत्या. या वेळी झालेल्या सुनावणीत त्यांना 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर सुटका करण्यात आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे

अंजली दमनियांविरुद्ध रावेर न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी अटक वॉरंट बजावलं होतं. दमानिया यांच्यावर मुंबईत दोन वेळा कर्करोगाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्यानं त्यांना प्रवास न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे यापूर्वी त्या कोर्टच्या तारखांना गैरहजर होत्या.

दरम्यान, खडसेंच्या बदनामीप्रकरणी दमानिया यांच्याविरोधात २२ ठिकाणी दाखल केलेल्या केसेस मुंबई हायकोर्टात एकत्रित चालविण्यात याव्यात अशी याचिका दाखल केल्याचं दमानिया यावेळी म्हणाल्या. या याचिकेत रावेर आणि मुक्ताईनगर कोर्टाचा उल्लेख नव्हता तो नव्यानं करण्यात आल्याचं दमानिया यावेळी सांगितलं. दरम्यान, यापुढे खडसेंच्या विरोधातली लढाई आणखी तीव्र करू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

First published: April 16, 2018, 7:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading