• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • ठाण्यात माणसांना विकले जनावरांचे इंजेक्शन!

ठाण्यात माणसांना विकले जनावरांचे इंजेक्शन!

जनावरांच्या इंजेक्शनवरचे लेबल बदलून माणसांना विकण्यात येत होते. अन्न आणि औषध प्रशासनाने याप्रकरणी लाईफ केईर मेडीकोवर छापा टाकला आहे

  • Share this:
ठाणे, 21 नोव्हेंबर: औषधं आणायला जाताना धडकी भरावी, अशी एक घटना ठाण्यामध्ये घडलीये. इथे जनावरांचे इंजेक्शन चक्क माणसांना विकले गेले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. ठाण्याच्या पाचपखाडी परिसरात हा प्रकार घडला आहे. जनावरांच्या इंजेक्शनवरचे लेबल बदलून माणसांना विकण्यात येत होते. अन्न आणि औषध प्रशासनाने याप्रकरणी लाईफ केईर मेडीकोवर छापा टाकला आहे. या छाप्यात या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात साठा जप्त करण्यात आलाय. नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. त्यात रविंद्र शिरोळे,ललिता झिंझाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलीस पुढील तपास करत आहेत. औषधांच्या बाबतीत घोळ होण्याची ही काही पहिली वेळ नाहीये. अशा अनेक घटना आधीही पुढे आलेल्या आहेत. त्यामुळे रूग्णांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय.
First published: