मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

माजी मंत्री अनिल परब यांना मोठा धक्का! ट्विन टॉवरप्रमाणे वादग्रस्त रिसॉर्ट होणार जमीनदोस्त

माजी मंत्री अनिल परब यांना मोठा धक्का! ट्विन टॉवरप्रमाणे वादग्रस्त रिसॉर्ट होणार जमीनदोस्त

शिवसेना नेते व माजी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील त्यांचे वादग्रस्त साई रिसॉर्ट (Sai Resort) लवकरच पाडणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीय.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

रत्नागिरी, 29 ऑगस्ट : शिवसेना नेते व माजी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील त्यांचे वादग्रस्त साई रिसॉर्ट (Sai Resort) पाडण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरीच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले आहे. याबाबत मुरुडमधील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे आणि शासकीय पद्धतीने पाडण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच कारवाई होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी बैठकीनंतर दिली आहे.

वादग्रस्त रिसॉर्ट जमीनदोस्त होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेला (Shivsena) पुन्हा धक्का दिला आहे. त्यांनी अनिल परब यांच्या दापोली येथील अनधिकृत रिसॉर्ट पाडावे या फाईलवर सही केली आहे. यावर आज मुरुडमधील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. जिल्हास्तरीय कोस्टल झोन मॉनिटरिंगची कमिटीची जिल्हाधिकाऱ्यांसोबतची बैठक संपली आहे. त्यानंतर केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे आणि शासकीय पद्धतीने पाडण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच कारवाई होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ बी एन पाटील यांनी दिली आहे. सी कॉन आणि साई रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात आराखडा तयार करण्यात आला आहे. रिसॉर्ट पाडसंदर्भात बांधकाम विभागाला नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

वाचा - पुन्हा राजकीय भूकंप? शिंदे गटातील 15-16 आमदार संपर्कात; शिवसेना नेत्याचा मोठा दावा

सोमय्यांचा आरोप अन् रिसॉर्ट जमीनदोस्त होणार

अनिल परब यांचे दापोली-मुरुड समुद्र किनाऱ्यावर असलेले साई रिसॉर्ट हे नियमांचे उल्लंघन करुन बांधल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खूप पूर्वी केला होता. यावरून त्यांनी अनेकदा धरणे आंदोलनही केले होते. या संदर्भातील सर्व कागदपत्रेही सोमय्यांनी सरकारला सादर केली होती. त्यानंतर आता रिसॉर्ट तोडण्याचा आदेश महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आले आहेत.

First published:

Tags: Anil parab