किरीट सोमय्या यांनी केलेल्या या तक्रारीनंतर या वादग्रस्त साई रिसॉर्टची पाहणी आज केंद्रीय पथकाकडून करण्यात आली. हे पथक केंद्राच्या पर्यावरण विभागाकडे अहवाल सादर करणार आहे, त्यानंतर या साई रिसॉर्टचे भवितव्य ठरणार आहे. सध्यातरी भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी सरकार यांच्यामधला कलगीतुरा या रिसॉर्ट च्या वादातून पाहायला मिळत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं बोललं जात आहे.अनिल परबांचं रिसॉर्ट वादाच्या भोवऱ्यात pic.twitter.com/nXHIraqOFg
— News18Lokmat (@News18lokmat) June 12, 2021
अनिल परब यांनी काही लोकांशी संगनमत करुन कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता सीआरझेडचे उल्लंघन करुन खोटे बनावटी कागदपत्रे, पुरावे तयार करुन 22 डिलक्स खोल्यांचे 4 तारांकित 10 कोटी रुपयांचा रिसॉर्ट बांधला आहे अशी तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. यासोबतच किरीट सोमय्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं होतं की, अनिल परब हे मंत्री आहेत, वकील आहेत तरीही त्यांनी अशी खोटी फसवणूक करण्याचा करार केला आणि शासनाची फसवणूक केली आहे. हे रिसॉर्ट बेकायदेशीर आहे आणि त्यावर कारवाई करावी.अनिल परबांचं रिसॉर्ट वादाच्या भोवऱ्यात; समुद्र किनाऱ्यावरील रिसॉर्टची केंद्रीय पथकाकडून पाहणी pic.twitter.com/QKlveAo7Py
— News18Lokmat (@News18lokmat) June 12, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anil parab, Ratnagiri