• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • आता एसटी ड्रायव्हर आणि कंडक्टरला पगाराबरोबरच Incentive मिळणार, अनिल परबांकडून योजनेची घोषणा

आता एसटी ड्रायव्हर आणि कंडक्टरला पगाराबरोबरच Incentive मिळणार, अनिल परबांकडून योजनेची घोषणा

Anil Parab big Announcement : एसटी ड्रायव्हर आणि कंडक्टरचं उत्पन्न वाढावं यासाठी त्यांना पगारासोबत Incentive देखील दिला जाणार असल्याची मोठी घोषणा अनिल परब (Anil Parab) यांनी केली आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 नोव्हेंबर : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचं गेल्या 15 दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन मागे घ्यावं यासाठी राज्य सरकारडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा सुटावा यासाठी पगारवाढीची देखील घोषणा केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन एक ते दहा वर्ष, दहा ते वीस वर्ष आणि वीस वर्षांपेक्षा जास्त वर्ष सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बेसिक वेतनात अनुक्रमे पाच, चार आणि अडीच हजार रुपयांच्या वेतनवाढीची घोषणा केलीय. या वेतनवाढीसोबत कर्मचाऱ्यांचं उत्पन्न आणखी वाढावं यासाठी एसटी ड्रायव्हर आणि कर्मचाऱ्यांना Incentive दिला जाईल. यासाठी आपण Incentive योजनेची देखील घोषणा करत असल्याचं अनिल परब यांनी स्पष्ट केलं.

  अनिल परब Incentive योजनेबाबत नेमकं काय म्हणाले?

  "आज वेगवेगळ्या चर्चा झाल्या. या चर्चेत कामगारांचे उत्पन्न कसं वाढेल याबाबतीत प्रामुख्याने चर्चा झाली. या चर्चेदरम्यान इन्सेन्टीवची योजना आम्ही आज जाहीर करत आहोत. आम्ही यावर निर्णय घेऊ. वेगवेगळ्या राज्यांमध्ये अशाप्रकारच्या योजना आहेत. एसटीचं उत्पन्न वाढलं तर ते उत्पन्न वाढविण्यासाठी जो ड्रायव्हर आणि कन्डक्टर असेल ज्याने जास्त पैसे आणले तर त्याच्या बाबतीत चांगले इन्सेटीव देऊ. आम्ही तसे इन्सेन्टीव लागू करु. म्हणजे पगाराबरोबरच एसटीचं उत्पन्न वाढविण्यासाठी कामगारांना प्रोत्साहन मिळेल", अशी भूमिका अनिल परब यांनी मांडली. हेही वाचा : अनिल परब यांची मोठी घोषणा, एसटी कर्मचाऱ्यांच्या बेसिक वेतनात थेट 5 हजारांनी वाढ

  'आत्महत्यांचा सहानुभूतीने विचार करु'

  "आज दुसरी देखील मागणी आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. कुणीही आत्महत्या करु नये, असं आमचं म्हणणं आहे. पण दुर्देवाने ज्या आत्महत्या झाल्या आहेत त्याचं शासन सहानभूतीने विचार करेल", अशी ग्वाही अनिल परबांनी कर्मचाऱ्यांना दिली. हेही वाचा : कुणीही वेगळं मत मांडू नका, एकत्र मिळून निर्णय घेऊया, सदाभाऊ खोत यांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

  अनिल परब पगारवाढीबाबत नेमकं काय म्हणाले?

  "जे कर्मचारी सेवेत एक वर्ष ते दहा वर्ष या कॅटेगिरीत आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात थेट 5 हजार रुपये वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याचं मुळ वेतन 12 हजार 80 रुपये होतं त्याचं आता 17 हजार 395 जालं आहे. त्याचं पूर्ण वेतन 17 हजार 395 होतं ते आता 24 हजार 694 झालं आहे. म्हणजे 7 हजार 200 रुपयांची वाढ पहिल्या कॅटेगिरीच्या कर्मचाऱ्यांसाठी केली आहे. पहिल्या कॅटेगिरीतील कर्मचाऱ्यांमध्ये पगाराबाबत नाराजी होती. त्यांचा आक्रोश गेल्या काही दिवसांमध्ये दिसला. त्यामुळे त्यांच्या पगारात फार मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या पगारवाढीपैकी ही एक मोठी वाढ आहे. जवळपास 41 टक्के ही पगारवाढ करण्यात आली आहे", अशी घोषणा अनिल परब यांनी केली. हेही वाचा : पगारवाढीची घोषणा केली, पण तरीही कर्मचाऱ्यांचा एल्गार सरुच, विलीनीकरणाशिवाय मागे हटणार नसल्याची भूमिका "10 ते 20 वर्ष सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात आम्ही 4 हजारांची वाढ केली आहे. त्यामुळे ज्यांचं मुळ वेतन 16 हजार होतं. त्यांचा पगार मुळ वेतनाच्या 23 हजार 40 रुपये आहे. आता वाढ केल्यानंतर त्यांचा पगार 28 हजार 800 इतका झाला आहे", अशी माहिती त्यांनी दिली. "20 वर्ष आणि त्याहून अधिक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात 2500 रुपयांनी वाढ केली आहे. ज्याचं स्थूल वेतन 37 हजार 440 होतं त्याचं वेतन आता 41 हजार 40 झालेलं आहे. ज्याचं स्थूलवेतन 53 हजार 280 होतं त्याचं वेतन 56 हजार 880 होईल", असंदेखील अनिल परबांनी सांगितलं.
  Published by:Chetan Patil
  First published: