मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Anil Parab and Kirit Somaiya : अखेर दापोलीतील तो रिसॉर्ट जमीनदोस्त, किरीट सोमय्यांनी केली मन की बात!

Anil Parab and Kirit Somaiya : अखेर दापोलीतील तो रिसॉर्ट जमीनदोस्त, किरीट सोमय्यांनी केली मन की बात!

भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या मागच्या काही महिन्यांपासून शिवसेना नेते अनिल परब यांच्या दापोली येथील कथीत रिसॉर्ट प्रकरणी जोरदार राडा सुरू आहे.

भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या मागच्या काही महिन्यांपासून शिवसेना नेते अनिल परब यांच्या दापोली येथील कथीत रिसॉर्ट प्रकरणी जोरदार राडा सुरू आहे.

भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या मागच्या काही महिन्यांपासून शिवसेना नेते अनिल परब यांच्या दापोली येथील कथीत रिसॉर्ट प्रकरणी जोरदार राडा सुरू आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 27 नोव्हेंबर : भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या मागच्या काही महिन्यांपासून शिवसेना नेते अनिल परब यांच्या दापोली येथील कथीत रिसॉर्ट प्रकरणी जोरदार राडा सुरू आहे. मागच्या दोन दिवसांपूर्वी किरीट सोमय्या  प्रतिकात्मक हातोडा घेऊन पुन्हा दापोलीत दाखल झाले होते. दरम्यान त्यांनी अनिल परब यांच्या विरोधात दापोली पोलिसांकडे जबाब नोंदवल्यानंतर साई रिसॉर्टवर हातोडा मारण्यासाठी दापोलीत गेले होते. दरम्यान आज दि. 27 यावर प्रत्यक्ष कारवाई झाल्याचे दिसत आहे. याबाबत किरीट सोमय्यांनी रिसॉर्ट पाडत असल्याचा व्हिडिओ ट्वीट केला आहे.

अनिल परब यांचे निकटवर्तीयांना ईडीचे समन्स

कथित मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने सदानंद कदम यांना चौकशीसाठी रविवारी समन्स बजावले आहे. सदानंद कदम यांना पुढील आठवड्यात ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

हे ही वाचा : तब्येतीचं कारण सांगून... राज ठाकरेंनी केली उद्धव ठाकरेंची नक्कल

सदानंद कदम हे महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि उद्धव गटातील शिवसेना नेते अनिल परब यांच्या जवळचे आहेत. विशेष म्हणजे दापोली रिसॉर्ट फसवणूक प्रकरणी अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ईडीने अनिल परब यांचीही चौकशी केली होती. याशिवाय त्यांच्या अनेक ठिकाणांवर छापेही टाकण्यात आले आहेत.

यावर अनिल परब काय म्हणाले

दापोलीतील साई रिसॉर्टचे आज पाडकाम करण्यात येणार होते. मात्र, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कोर्टाने या कारवाईला स्थगिती दिली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अनिल परब यांनी म्हटले की, आज कोर्टाने रिसॉर्टच्या कारवाईला स्थगिती दिली आहे. त्यामुळे सध्या रिसॉर्टला कोर्टाचे संरक्षण आहे. 

या रिसॉर्टचे बांधकाम करण्यासाठी शासनाने परवानगी दिली. त्यामुळे शासनाने परवानगी दिली असेल आणि ती चुकीचे असेल तर मालकाचा किती दोष आहे, हे तपासावे लागेल असे परब यांनी म्हटले. साई रिसॉर्टवर लावण्यात येणारा नियम हा सगळ्याच रिसॉर्टला लावावा लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले. 

हे ही वाचा : आपलं वय काय, बोलताय काय? पदाचा मान राखतोय, अन्यथा शिव्या खूप आहेत; राज ठाकरेंचा कोश्यारींवर निशाणा

किरीट सोमय्या माझी बदनामी करत असल्याचा आरोप परब यांनी केला. जे शिंदे गटात गेलेत त्यांच्यावर बोलण्याची हिंमत सोमय्या यांच्यात नाही. नारायण राणे यांच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी सोमय्या हातोडा घेऊन गेले नाहीत. सुभाष देशमुख यांचे घरदेखील अनधिकृत आहे. मात्र, सोमय्या तिकडे जाणार नाहीत. सोमय्या हे स्टंट नाही तर नौटंकी करत असल्याचे परब यांनी म्हटले.

First published:

Tags: Anil parab, Dapoli, Kirit Somaiya