मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Breaking : अनिल जयसिंघानीला अखेर अटक, गुजरातमधून घेतलं ताब्यात!

Breaking : अनिल जयसिंघानीला अखेर अटक, गुजरातमधून घेतलं ताब्यात!

अनिल जयसिंघानीला अटक

अनिल जयसिंघानीला अटक

मोठी बातमी समोर येत आहे. अखेर बुकी अनिल जयसिंघानी याला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 20 मार्च : मोठी बातमी समोर येत आहे. अखेर बुकी अनिल जयसिंघानी याला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अनिल जयसिंघानी याला अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता अनिल जयसिंघानी याला अटक करण्यात आली आहे.

अनिक्षा जयसिंघानीला अटक  

अनिक्षा जयसिंघानी ही बुकी अनिल जयसिंघानीची मुलगी आहे. तिच्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपये लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात काही दिवसांपूर्वीच अनिक्षा जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे. तर अनिल जयसिंघानी हा फरार होता. अखेर त्याला गुजरातमधून ताब्यात घेण्यात आलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण

अनिक्षा जयसिंघानी ही बुकी अनिल जयसिंघानीची मुलगी आहे. 2016 -17 ला तिची ओळख अमृता फडणवीस यांच्याशी झाली होती. त्यानंतर पुन्हा अनिक्षा 2021 मध्ये अमृता फडणवीस यांच्या संपर्कात आली. तिने अमृता फडणवीस यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आपल्या वडिलांना एका चुकीच्या प्रकरणात अडकवण्यात आलं आहे. त्यांना सोडवण्यासाठी मदत करावी अशी मागणी तिने अमृता फडणवीस यांच्याकडे केली. मात्र अमृता फडणवीस यांनी त्याला नकार दिल्यानंतर तिने अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपये लाच देण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर अमृता फडणवीस यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फडणवीस यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अनिक्षा जयसिंघानीला अटक केली. त्यानंतर आता तिच्या वडिलांना बुकी अनिल जयसिंघानी याला देखील गुजरातमधून अटक करण्यात आली आहे.

First published:
top videos