'राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो', 26 वर्षानंतर अनिल गोटे-शरद पवार भेट

'राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो', 26 वर्षानंतर अनिल गोटे-शरद पवार भेट

'राजकारणामध्ये कोणी दीर्घकाळ शत्रू नसतो. मी शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे'

  • Share this:

धुळे, 20 मार्च : भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. एकमेकांचे कायम टीकाकार राहिलेल्या गोटे-पवार भेटीने राजकीय वर्तुळात मोठं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सुभाष भामरेंचा पराभव करण्यासाठी आपण शरद पवार यांची भेट घेतली आहे, अशी प्रतिक्रिया अनिल गोटे यांनी दिली आहे.

'राजकारणामध्ये कोणी दीर्घकाळ शत्रू नसतो. मी शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे,' असं म्हणत अनिल गोटे यांनी धुळ्यातील भाजप नेते सुभाष भामरे यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. यावेळी त्यांनी सुभाष भामरेंवर अनेक गंभीर आरोपही केले आहेत.

'सुभाष भामरे यांनी धुळे जिल्ह्याची वाट लावली आहे. त्यामुळे त्यांचा पराभव करण्यासाठी मी भामरेंविरोधात निवडणूक लढवत आहे,' अशी घोषणा अनिल गोटे यांनी केली आहे.

दरम्यान, अनिल गोटे हे राजकारणात नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचे टीकाकार म्हणून ओळखले जातात. परंतु आपल्याच पक्षातील प्रतिस्पर्धाला धूळ चारण्यासाठी आता त्यांनी तब्बल 26 वर्षानंतर शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याचा खुलासा करण्यास मात्र अनिल गोटे यांनी नकार दिला आहे.

VIDEO : अजित पवारांना भेटलो होतो, पण.., राज ठाकरेंचा खुलासा

First published: March 20, 2019, 11:21 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading