मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नागपूरला जाण्यााची परवानगी द्या; अनिल देशमुखांचा न्यायालयाकडे अर्ज

नागपूरला जाण्यााची परवानगी द्या; अनिल देशमुखांचा न्यायालयाकडे अर्ज

अनिल देशमुख

अनिल देशमुख

अनिल देशमुख यांना न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. मात्र जामीन मंजूर करतानाच अनेक अटी देखील घालण्यात आल्या आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 3 फेब्रुवारी :  माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख हे सध्या जामिनावर बाहेर आहेत. मात्र देशमुख यांना जामीन मंजूर करताना न्यायालयानं अनेक अटी घातल्या होत्या. मुंबईबाहेर जाण्यासाठी त्यांना न्यायालयाची परवानगी बंधनकारक असेल, ही त्यातली एक प्रमुख अट आहे. आता अनिल देशमुख यांनी विशेष न्यायालयाकडे अर्ज केला आहे. नागपूर जिल्ह्यात जाण्यासाठी आपल्याला चार आठवड्यांची परवानगी देण्यात यावी अशी मागणी या अर्जाद्वारे अनिल देशमुख यांनी न्यायालयाकडे केली आहे. विशेष न्यायालय अनिल देशमुख यांचा अर्ज मान्य करून त्यांना नागपूर जिल्ह्यात जाण्याची परवानगी देणार का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अनिल देशमुखांचा अर्ज 

नागपूर जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी विशेष न्यायालयाकडे अर्ज केला आहे. नागपूर हा अनिल देशमुख यांचा गृह जिल्हा आहे. देशमुख यांचा मतदारसंघ काटोल हा देखील नागपूर जिल्ह्यातच येतो, त्यामुळे मतदार संघातील लोकांच्या संपर्कात राहाता यावे, आमदार म्हणून कर्तव्य बजावता यावे तसेच कुटुंबाला भेटता यावे यासाठी नागपूर जिल्ह्यात जाण्याची परवानगी मिळावी असं आपल्या अर्जात देशमुख यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : Nashik MLC Election : सत्यजित तांबे कोणाला पाठिंबा देणार? विजयानंतर तांबेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबईबाहेर जाण्यासाठी परवानगीची अट  

अनिल देशमुख यांना न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. मात्र जामीन  मंजूर करतानाच अनेक अटी देखील घालण्यात आल्या आहेत. जामीन मंजूर करताना अनिल देशमुख यांना जर मुंबईच्या बाहेर जायचे असेल तर त्यांना न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे, अशी अट घालण्यात आली आहे. त्यामुळे आता नागपूरला जाण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी अनिल देशमुख यांनी न्यायलयात अर्ज केला आहे.

First published:

Tags: Anil deshmukh, Court, NCP