मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अनिल देशमुखांना धक्का, काटोल बाजार समिती निवडणुकीत भाजपने मारली बाजी

अनिल देशमुखांना धक्का, काटोल बाजार समिती निवडणुकीत भाजपने मारली बाजी

 अनिल देशमुख यांच्या पॅनेलचा पराभव झाला आहे. भाजपच्या शेतकरी उत्कर्ष सहकार पॅनलने विजय मिळवला आहे.

अनिल देशमुख यांच्या पॅनेलचा पराभव झाला आहे. भाजपच्या शेतकरी उत्कर्ष सहकार पॅनलने विजय मिळवला आहे.

अनिल देशमुख यांच्या पॅनेलचा पराभव झाला आहे. भाजपच्या शेतकरी उत्कर्ष सहकार पॅनलने विजय मिळवला आहे.

नागपूर, 04 ऑक्टोबर : राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) हे ईडीच्या (ed) कारवाईमुळे गायब झाले आहे. त्यांचा कुठेही थांगपत्ता लागत नाही. पण, भाजपने देशमुखांना आणखी एक धक्का दिला आहे. काटोल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ( Katol Bazar Samiti election ) भाजपने अनिल देशमुखांच्या पॅनेलचा दारुण पराभव केला आहे.

भाजपने माजी गृहमंत्री अनिल देखमुख यांना चांगलाच धक्का दिला आहे. काटोल कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत अनिल देशमुख यांच्या पॅनेलचा पराभव झाला आहे. भाजपच्या शेतकरी उत्कर्ष सहकार पॅनलने विजय मिळवला आहे. अनिल देशमुख यांच्या पॅनलचा 18 पैकी 14 म्हणजे भाजप 14 राष्ट्रवादी 4 या फरकाने पराभव केला आहे.

भाजप समर्थक पॅनलने सेवा सहकारी संस्था मतदार संघातून 11 तर ग्राम पंचायत मतदार संघातून 3 असे 14 उमेदवार निवडून आले आहे.

जगभरातल्या बड्या व्यक्तींच्या गुप्त संपत्तीची माहिती उघड करणार Pandora Papers?

विशेष म्हणजे, काटोल बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.  काटोल न.प.चे गटनेते चरणसिंग ठाकूर आणि केशवराव डेहनकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने निवडणूक लढवली होती.  तर कळमेश्वर बाजार समितीवर काँग्रेस समर्थक केदार गटाने एकतर्फी विजय मिळवला आहे. रविवारी दोन जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत केदार गटाने दोन्ही जागा पटकावल्या.

लेकीच्या Period leave साठी बाबाची धडपड; शाळेतील सुट्टीसाठी लढतोय लढा

तर नरखेड बाजार समितीच्या निवडणुकीत सहकारी संस्थेच्या गटातून 11 जागांपैकी महाविकास आघाडी पॅनलने 5 आणि बळीराजा सहकार पॅनलने 6 जागा जिंकल्या आहे. ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीने चारही जागा जिंकल्या आहे.

First published:
top videos