Home /News /maharashtra /

पोलीस आणि गृहमंत्र्यांच्या नात्यातला भावनिक क्षण, कर्मचारी गेले भारावून

पोलीस आणि गृहमंत्र्यांच्या नात्यातला भावनिक क्षण, कर्मचारी गेले भारावून

गृहमंत्री अनिल देशमुख हे पुण्यावरून मुंबईच्या दिशेनं प्रवास करत होते. नेहमी प्रमाणे पोलिसांचा बंदोबस्त दिसून आल्यामुळे गृहमंत्र्यांनी आपला ताफा थांबवला

    मुंबई, 08 जून : महाराष्ट्रापुढे कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. कोरोनाशी दोन हात करत राज्याचे पोलीस कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावून कर्तव्य बजावत आहे.  पोलिसांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आवर्जून पोलिसांच्या भेटी घेत आहे. आज अशीच एक भेट मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर झाली आणि अवघ्या पोलीस दलासाठी ती खास ठरली. गृहमंत्री अनिल देशमुख हे पुण्यावरून मुंबईच्या दिशेनं प्रवास करत होते. नेहमी प्रमाणे पोलिसांचा बंदोबस्त दिसून आल्यामुळे गृहमंत्र्यांनी आपला ताफा थांबवला आणि पोलिसांशी संवाद साधला.  किवळे फाट्यावर अनिल देशमुख कर्तृव्यावर असलेल्या पोलिसांशी चर्चा करत होते. त्यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस  उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांचा आज वाढदिवस असल्याचं लक्षात आले. त्यामुळे अनिल देशमुख यांनी तातडीने केक आण्यास सांगितले. पोलिसांच्या गाडीवरच केक कापून श्रीकांत जाधव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. खुद्द अनिल देशमुख यांनी श्रीकांत जाधव यांना केक भरवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राज्याच्या गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत आपला वाढदिवस साजरा झाला आणि खुद्द गृहमंत्र्यांनीच केक भरवला, यामुळे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव  यांच्यासह सर्वच अधिकारी आणि कर्मचारी भारावून गेले होते. हेही वाचा - 10 वी आणि 12 वीचा निकाल कधी लागणार? बोर्डाकडून दिलं उत्तर कोरोनाच्या परिस्थितीत जीवाची बाजी लावून पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडत आहे. काही पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे तर अजूनही काही कर्मचारी हे कोरोनाशी लढा देत आहे. पोलीस आणि गृहमंत्र्यांच्या नात्यातला हा भावनिक क्षण आज पोलिसांचे मनोधैर्य वाढवणार आहे. संपादन - सचिन साळवे
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या