नगरच्या उपमहापौरपदावर शिवसेनेचे अनिल बोरुडे

नगरच्या उपमहापौरपदावर शिवसेनेचे अनिल बोरुडे

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याचा राजीनामा घेतल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर शिवसेनेचे अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

  • Share this:

अहमदनगर, 05 मार्च : शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याचा राजीनामा घेतल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर शिवसेनेचे अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीतून भाजप, राष्ट्रवादीने माघार घेतल्याने अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

अहमदनगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्याची हकालपट्टी करण्यात आली.  त्या रिक्त झालेल्या उपमहापौरपदाची आज निवडणूक होणाराय. भाजपने प्रायश्चित म्हणून निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतलाय... उपमहापौर पदासाठी शिवसेनेनं दावा केलाय, शिवसेनेकडून अनिल बोरुडे आणि दीपाली बारस्कार यांनी तर मनसेच्या विणा बोज्जा आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस कडून विपुल शेटिया, आरिफ शेख यांनी अर्ज भरलाय...  शिवसेनाला बंडखोर गटाचा पाठींबा मिळण्याची शक्यता आहे, भाजपने आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवलीय.

First published: March 5, 2018, 12:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading