Home /News /maharashtra /

Amaravati : अमरावतीमध्ये वैद्यकीय व्यवसायिकाच्या हत्या त्या कारणावरूनच, अनिल बोंडेंचा संशय

Amaravati : अमरावतीमध्ये वैद्यकीय व्यवसायिकाच्या हत्या त्या कारणावरूनच, अनिल बोंडेंचा संशय

  अमरावती, 1 जुलै : अमरावती (Amaravati) शहरात उमेश कोल्हे वैद्यकीय व्यवसायाची हत्या झाल्याचे समोर आले आहे. (medical business) उमेश यांची एका वादग्रस्त प्रकरणावरून हत्या झाली (murder in Amaravati) असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान याबाबत भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे (bjp mp anil bonde) यांनी  आवाज उठवला आहे. बोंडे यांनी याची चौकशी व्हावी असे सांगितले आहे.

  उमेश यांनी एका वादग्रस्त पोस्टला समर्थन केल्याप्रकरणी राजस्थानमध्ये एका टेलरची हत्या करण्यात आली त्याच प्रमाणे उमेश यांचीही हत्या करण्यात आल्याचा संशय बोंडे यांनी व्यक्त केली आहे. अमरावती शहरात मागच्या 10 दिवसांपूर्वी उमेश कोल्हे यांची हत्या झाली आहे. उमेश हे मेडिकल व्यावसायिक होते. तसेच उमेश यांनी सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल केल्या होत्या. म्हणून त्यांची हत्या झाली असावी असा अंदाज भाजपचे खासदार डॉ अनिल बोंडे यांनी व्यक्त केला.

  हे ही वाचा : शिंदे सरकारचं भवितव्य रविवारी होणार निश्चित, Floor Test पूर्वीच निर्णायक परीक्षा

  यामध्ये काही आरोपींना पकडण्यात आले आहे आरोपींनी अद्याप हत्येचा उद्देश सांगितेला नसल्याचे बोंडे म्हणाले. पोलिसांनी बोंडे यांना दिलेल्या माहितीनुसार, एकाने आम्हाला हत्या करण्यास सांगितले म्हणून आम्ही हत्या केल्याचे संशयीत आरोपींनी पोलिसांत सांगितल्याचे बोंडे म्हणाले. याचबरोबर अमरावतीमधील 10 लोकांना सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्याबद्दल धमक्या आल्या आहेत. पोस्ट लिहीणाऱ्यांकडून माफीनामा लिहून घेण्यात आला, मात्र ह्या धमक्या कुणी दिल्या? याचाही तपास अद्याप पोलिसांकडून झालेला नाही, असा गंभीर आरोप डॉ बोंडे यांनी केला आहे.

  हे ही वाचा : टीव्हीवर जाऊन देशाची माफी मागा; नुपूर शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारल

  धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई

  पोलिसांनी नुकतंच प्रेसनोट जारी करत सांगितले की, या गुन्ह्याचे संबंधाने कोणीही धार्मिक तेढ निर्माण होईल, असे विधान करू नये केल्यास कलम 153 (अ) भा.दं.वी. प्रमाणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद करण्यात येईल. गुन्ह्याचा सर्व बाजूने तपास तसेच तांत्रिक दृष्ट्या सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

  नुपूर शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं

  प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फटकारले आहे. तुमच्या वक्तव्याने देशातील वातावरण बिघडले आहे, असे सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मा यांना सुनावले. तुम्ही टीव्हीवर जाऊन माफी मागावी, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

  सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, तुम्ही बेजबाबदार विधान केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, तुम्ही स्वत:ला वकील म्हणता, तरीही असे वक्तव्य केले. तुमच्या वक्तव्यामुळे देशातील वातावरण बिघडले आहे. तुमच्या वक्तव्यामुळे देशाची बदनामी झाली आहे. यासोबतच सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्माची याचिका फेटाळून लावली. याप्रकरणी तुम्ही उच्च न्यायालयात जा, असे न्यायालयाने सांगितले. नुपूर शर्मा यांनी त्यांच्याविरुद्ध विविध राज्यांत दाखल झालेले सर्व खटले दिल्लीला हस्तांतरित करण्यासाठी अर्ज केला होता.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Amravati, Murder news, अमरावतीamravati

  पुढील बातम्या