अनिकेत कोथळे हत्या प्रकरणी सांगलीच्या पोलीस अधिक्षकांची नागपूरला बदली

अनिकेत कोथळे हत्या प्रकरणी सांगलीच्या पोलीस अधिक्षकांची नागपूरला बदली

दत्तात्रय शिंदेंच्या जागी पोलीस अधीक्षकपदी सुहैल शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलीये.

  • Share this:

23 नोव्हेंबर : अनिकेत कोथळे हत्या प्रकरणी सांगलीचे पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे आणि उपअधिक्षक डॉ. दीपाली काळे यांची अखेर बद्दली बदली करण्यात आलीय. दत्तात्रय शिंदेंच्या जागी  पोलीस अधीक्षकपदी सुहैल शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलीये.

अनिकेत कोथळे हत्या प्रकरणी प्रकरणी या दोघांची चौकशी सुरू होती. राज्याच्या गृह विभागाने गुरुवारी बदल्यांचे आदेश जारी केले. दत्तात्रय शिंदे यांची नागपूरला तर दीपाली काळे यांची सोलापूरला बदली करण्यात आलीय.

पोलीस अधीक्षकपदी सुहैल शर्मा यांची नेमणूक करण्यात आलीय. तर उपअधीक्षकपदी अशोक विरकर यांची नियुक्ती करण्यात आलीय. लूटमार प्रकरणी अटकेत असलेल्या अनिकेत अशोक कोथळे या आरोपीचा सांगली पोलिसांच्या अमानुष मारहाणीत मृत्यू झाला.

पोलिसांनी हे प्रकरण दडपण्यासाठी मृतदेह आंबोलीत नेऊन जाळला आणि आरोपी पळून गेल्याचा बनाव रचला. मात्र सखोल चौकशीनंतर अनिकेतचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचे स्पष्ट झालं. आंबोलीत नेऊन जाळल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह पाच पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलंय.

First published: November 23, 2017, 7:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading