बाथरूममध्ये गेली होती पत्नी.. पतीने मोबाइल हिसकावताच तिने केला हा 'प्रताप'

बाथरूममध्ये गेली होती पत्नी.. पतीने मोबाइल हिसकावताच तिने केला हा 'प्रताप'

नूतन या मोबाइल घेऊन बाथरूममध्ये गेल्या होत्या.

  • Share this:

कल्याण,1 डिसेंबर: पती-पत्नीमध्ये कोणत्या कारणावरून भांडण होईल, याचा काही नेम नाही. अशीच एक विचित्र घटना कल्याणमध्ये घडली आहे. पतीने मोबाइल हिसकावला म्हणून संतापलेल्या पत्नीने पतीच्या हाताला चावा घेतला आहे. या प्रकरणी पत्नीविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. पोलिसांनी आरोपी पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कल्याण पश्चिमेकडील खंडागळे सदन येथे दिलीप रेहनकर कुटुंबासह राहतात. शनिवारी सकाळी दिलीप यांच्या पत्नी नूतन या मोबाइल घेऊन बाथरूममध्ये गेल्या होत्या. बाथरूममधून बाहेर आल्यानंतर दिलीप यांनी नूतन यांच्याकडे मोबाइल मागितला, मात्र पत्नीने मोबाइल देण्यास नकार दिला. दिलीप यांनी पत्नीच्या हातातून मोबाइल हिसकावला. मात्र नूतन यांनी मोबाइल पुन्हा परत घेऊन घराबाहेर जाऊन पतीला शिवीगाळ केली. याचा दिलीप यांना राग आला. त्यांनी नूतन यांच्या हातातून मोबाइल हिसकावण्याचा पुन्हा प्रयत्न केला असता नूतन यांनी दिलीप यांच्या हाताला चावा घेतला. आता हा कौटुंबीक वाद पोलिस स्टेशनमध्ये गेला आहे.

या प्रकरणी दिलीप यांनी महात्मा फुले पोलिस स्टेशनमध्ये पत्नीच्या विरूद्ध तक्रार दाखल केली आहे. दिलीप यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पत्नी नूतनविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

स्वयंपाक घरातच पुरला पतीचा मृतदेह..

पतीची निर्घृण हत्या करुन स्वयंपाकघरात मृतदेह पुरल्याची धक्कादायक घटना गेल्या आठवड्यात समोर आली होती. स्वयंपाकघरात मृतदेह पुरुन त्यावर महिला जेवण करत होती. महिलेनं हत्या केल्याचं भिंग फुटताच तिने पतीच्या कुटुंबियांवर आरोप केला. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील अनूपपूर जिल्ह्यात घडली होती.

32 वर्षीय प्रमिलाने आपल्या वकील असलेल्या पतीची महेशची निर्घृण हत्या केली आणि त्याचा मृतदेह कुणाला या हत्येचा संशय येऊ नये म्हणून स्वयंपाकघरात पुरला. पुरावे नष्ट करण्यासाठी पत्नीने स्वत: पोलिसात पती गायब असल्याची तक्रार दिली. पतीच्या नातेवाईकांना घरात येण्यावर महिलेनं निर्बंध घातले. महिलेचं हे पितळ मृताच्या भावाने उघडं पाडलं असून आरोपीला गुरुवारी अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

22 ऑक्टोबर रोजी आपला पती गायब आहे अशी तक्रार प्रमिलाने केली होती. त्यानंतर पोलीस शोधार्थ होते. मात्र 21 नोव्हेंबर रोजी अचानक पोलिसांसमोर एक ट्विस्ट आला आणि संपूर्ण केसचा उलगडा झाला. मृतकाच्या मोठ्या भावाने अर्जुन बैनेवाल याने पोलिसांना घराचा तपास करण्याची विनंती केली. मला आणि आई-वडिलांना प्रमिला घरात घेत नाही. वारंवार घालून पाडून बोलते आणि दारातून हाकलवून देत असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. भावाच्या बोलण्यात तथ्य असल्याचं लक्षात येताच अमरकंटक पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रमिलाच्या घरी पोहोचले. त्यांनी घऱाची झडती घेण्यास सुरुवात केली तेव्हा स्वयंपाघरातून दुर्गंधी येत होती. पोलिसांनी स्वयंपाकघर खोदन तेव्हा कुजलेल्या अवस्थेत पतीचा मृतदेह सापडला.

First published: December 1, 2019, 10:25 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading