मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

रावसाहेब दानवे यांचा DNA तपासावा लागेल, बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया

रावसाहेब दानवे यांचा DNA तपासावा लागेल, बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया

 शेतकऱ्यांबद्दल दानवे अशा पद्धतीनं बोलत असतील तर त्यांचा डीएनए (DNA) हिंदुस्थानी आहे की पाकिस्तानी हे तपासावे लागेल.

शेतकऱ्यांबद्दल दानवे अशा पद्धतीनं बोलत असतील तर त्यांचा डीएनए (DNA) हिंदुस्थानी आहे की पाकिस्तानी हे तपासावे लागेल.

शेतकऱ्यांबद्दल दानवे अशा पद्धतीनं बोलत असतील तर त्यांचा डीएनए (DNA) हिंदुस्थानी आहे की पाकिस्तानी हे तपासावे लागेल.

  • Published by:  Sandip Parolekar

अमरावती, 10 डिसेंबर: सर्व देशभर शेतकर्‍यांच्या आंदोलनाला (farmer protest in delhi) चांगला प्रतिसाद मिळत असताना भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (BJP Leader raosaheb danve) यांनी शेतकऱ्यांना पाकिस्तान आणि चीनमधून मदत मिळत आहे, असं बेताल वक्तव्य केलं आहे. रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. शेतकऱ्यांबद्दल दानवे अशा पद्धतीनं बोलत असतील तर त्यांचा डीएनए (DNA) हिंदुस्थानी आहे की पाकिस्तानी हे तपासावे लागेल, अशी संतप्त प्रतिक्रिया राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu)  यांनी दिली आहे.

बच्चू कडू यांनी सांगितलं की, आम्ही दानवे यांच्या घरासमोर आंदोलन केलं होतं. आता दानवे यांच्या घरात घुसून त्यांना मारावं लागेल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बच्चू कडू हे सध्या दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्ली मार्गावर आहेत.

हेही वाचा...पतीसमोर 17 मद्यधुंद तरुणांनी केला महिलेवर सामूहिक बलात्कार

नेमकं काय म्हणाले रावसाहेब दानवे?

कृषी बिल रद्द करावं की नाही यावरून सुरू असलेल्या राजकीय वादात आता रावसाहेब दानवेंनी देखील उडी घेतली आहे. त्यांन अजब वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्यांच्या अजब दाव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केंद्रीय मंत्री दानवे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

राजधानी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. सुधारित नागरिकत्व कायदा आणि NRC च्या माध्यमातून आधी मुस्लीम बांधवांची दिशाभूल केली पण ते प्रयत्न यशस्वी झाले नाहीत त्यामुळे आता शेतकऱ्यांचे कान भरण्याचं काम सुरू आहे. नव्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल असं सांगून त्यांचे कान भरण्याचं काम सुरू असल्याचा गंभीर आरोप दानवेंनी केला आहे.

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील कोलते टाकळी इथे आरोग्य केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान दानवे यांनी हे अजब विधान करत पाकिस्तान आणि चीनवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, 'जे आंदोलन सुरू आहे ते शेतकर्‍यांचे नाही. चीन आणि पाकिस्तानचा या आंदोलनामागे हात आहे. CAA आणि NRC वरून या पूर्वी मुस्लीम बांधवांना चिथवण्यात आलं मात्र ते प्रयत्न अपयशी ठरले. NRC येत आहे 6 महिन्यात मुस्लिमांना देश सोडावा लागेल असं सांगण्यात आलं होतं मात्र NRC आणि CAA आल्यानंतर कुठल्या मुस्लीम बांधवांना देश सोडवा लागला असा सवाल देखील दानवे यांनी उपस्थित केला आहे.

बच्चु कडूंच्या वाहनांचा ताफा रोखला...

दरम्यान, केंद्रीय कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी निघालेले महाराष्ट्राचे मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडु यांच्या वाहनांचा ताफा उत्तर प्रदेश पोलिसांनी युपीच्या सीमेवर धौलपूरजवळ रोखला. उत्तर प्रदेशातील पोलिसांनी आता दडपशाही सुरू केली असून दिल्लीत जाता येऊ नये म्हणून सर्व मार्गावर पोलिसांनीच चक्का जामच्या नावाखाली बंद केला आहे, असा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.

ग्वालियर येथून भरतपूर मार्गावरुन जाण्यासाठी बच्चू कडु यांच्या वाहनांचा ताफा निघाला होता. मात्र राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवरील धौलपूरला येताच उत्तर प्रदेश पोलिसांनी वाहनांचा ताफा रोखला. पुढे आग्रा व इतर भागात चक्का जाम असल्याचे कारण पुढे केल्याने पर्यायी भरतपूर मार्गे ताफा नेण्यास पोलिसांनी सांगितले. परंतू भरतपूरपासून पुढचे सगळे मार्ग उत्तर प्रदेश पोलिसांनी स्वतःहून बंद केल्याने आज भरतपूरलाच गुरूद्वारात मुक्काम करावा लागला.

महाराष्ट्राचे मंत्री बच्चू कडू यांना जागो जागी समर्थन मिळत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार धास्तावले असून बच्चू कडू यांना युपीत प्रवेशच मिळू द्यायचा नाही या हेतूने त्यांचे सर्व मार्ग रोखले जात आहेत, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. उत्तर प्रदेशात दाखल होत बुधवारी हजारो समर्थकांचा मथुरा-वृंदावनला मुक्काम होता.

हेही वाचा...बाजाच्या सुरावटींची गुंफण करणारा संगीतकार हरपला, नरेंद्र भिडे यांचं निधन

बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मथुरा वृंदावन जाण्यास उत्तर प्रदेश पोलिसांनी मनाई केली. त्यामुळे ऐनवेळी कडू यांना भरतपूरला मुक्काम करावा लागला असून आज गुरूवारी (ता.10) सकाळी हजारो समर्थकांचा ताफा पलवलच्या दिशेने रवाना होणार आहे. दिल्ली सीमेवरील पलवल येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असून या आंदोलनात बच्चू कडू आपल्या सहकाऱ्यांसह सहभागी होणार आहेत.

First published: