Home /News /maharashtra /

मुस्लीम संघटना संतप्त, वारीस पठाणचा शिरच्छेद करणाऱ्यास 11 लाखांच्या बक्षिसाची घोषणा

मुस्लीम संघटना संतप्त, वारीस पठाणचा शिरच्छेद करणाऱ्यास 11 लाखांच्या बक्षिसाची घोषणा

एमआयएमचे वारीस पठाण यांनी देशातील हिंदूबाबत धक्कादायक वक्तव्य केलं होतं.

    मुजफ्फरपूर, 22 फेब्रुवारी : एमआयएमचे वारीस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे ते अडचणीत सापडले आहेत. गुलबर्गा येथील एका सभेत वारीस पठाण यांची जीभ घसरली होती. यावेळी त्यांनी 100 कोटी हिंदू जनतेवर 15 कोटी मुस्लीम भारी पडतील, असं धक्कादायक वक्तव्य केलं होतं.  आम्हाला स्वातंत्र्य दिलं जात नसेल तर ते मिळवावं लागेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला होता. या वक्तव्यामुळे देशभरात वारीस पठाण यांच्यावर टीका करण्यात आली होती. आता तर हक-ए-हिंदुस्तान मोर्चा या मुस्लीम संघटनेने त्यांच्याविरोधात घोषणा केली आहे. वारीस पठाण याचा शिरच्छेद करा, हे करणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस देऊ अशी घोषणा या मुस्लीम संघटनेने केली आहे. यावेळी मुजफ्फरपूर येथील कंपनी बाग रोडवर मुस्लीम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वारीस पठाण याचा पुतळाही जाळला. हक-ए-हिंदुस्तान या संघटनेचे राष्ट्रीय संयोजक तमन्ना हाश्मी यांनी वारीण पठाणला देशद्रोही म्हटलं आहे. हेही वाचा - शिवाजी महाराज की जय अशी घोषणा दिली का? नवाब मलिक यांनी केला खुलासा काय म्हणाले होते वारीस पठाण? गुलबर्गा येथील एका सभेत एमआयएमचे वारीस पठाण यांनी एक धक्कादायक विधान केलं होतं. ‘100 कोटी हिंदू जनतेवर 15 कोटी मुस्लीम भारी पडतील. आम्हाला स्वातंत्र्य दिलं जात नसेल तर ते मिळवावं लागले’ असं विधान त्यांनी केलं होतं. यानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी वारीस पठाण यांच्याविरोधात कारवाई केली आहे. वारीस पठाणला मीडियाशी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. जोपर्यंत पक्षाकडून परवानगी दिली जात नाही तोपर्यंत मीडियाशी बोलता येणार नसल्याचं ओवेसींनी म्हटले आहे. वारीस पठाण यांच्या तोंडी देशद्रोह्यांची व पाकिस्तानची भाषा असून हे आम्ही अजिबात सहन करणार नसल्याचे हक-ए-हिंदुस्तान या संघटनेचे राष्ट्रीय संयोजक तमन्ना हाश्मी यांनी म्हटले आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या