भास्कर मेहरे, प्रतिनिधी
यवतमाळ, 30 ऑक्टोबर : यवतमाळ जिल्ह्यातील (Yavatmal) महागाव इथं पीक कर्ज आणि नवीन खाते उघडण्यासाठी शेतकऱ्यांनी गेले असता त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या सुरक्षारक्षकांनी मुजोरी केली आणि शेतकऱ्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बँकेत प्रवेश केला आणि त्याठिकाणी तोडफोड केली.
रब्बी पिकासाठी कर्ज मिळावे यासाठी परिसरातील काही शेतकरी महागावच्या युनियन बँकेत (union bank) गेले होते. परंतु, त्यावेळी सुरक्षारक्षकांनी या शेतकऱ्यांशी अरेरावी केली आणि त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लांबून आलेले शेतकरी चांगलेच संतप्त झाले होते. शेतकऱ्यांनी 'आम्ही कर्ज घेण्यासाठी आलो आहोत', अशी विनंतीही केली. पण तरीही सुरक्षारक्षकांनी त्यांना आतमध्ये जाण्यास मनाई केली. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेवटी सुरक्षारक्षकाला बाजूला सारून बँकेचे गेट उघडले आणि बँकेत प्रवेश केला. यावेळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बँकेतील साहित्याची तोडफोड केली.
उर्मिला मातोंडकर यांना मुख्यमंत्र्यांचा फोन, सेनेकडून मोठ्या ऑफरची चर्चा
सध्या परतीच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच बँकेकडून त्यांना अतिशय अपमानस्पद वागणूक दिली जात आहे. यावरून यवतमाळचे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी नुकतीच बँकेची बैठक घेऊन शेतकऱ्यांना कर्ज पुरवठ्याच्या सूचना दिल्या. मात्र, बँकेचे अधिकारी या सूचनांना केराची टोपली दाखवत आहे.
कोरोनाचा विळखा आणखीन घट्ट, या देशानं 6 महिन्यांसाठी जाहीर केली हेल्थ इमरजन्सी
त्यामुळेच वैतागलेल्या शेतकऱ्यावर कायदा हातात घेण्याची वेळ येत आहे. शेतकऱ्यांबाबत बँकेने सौजन्याची वागणूक दाखवली नाही तर अशा घटनामध्ये भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.