• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • लग्नानंतर मित्राने बोलणं बंद केल्याचा राग; मैत्रिणीने केलं धक्कादायक कृत्य

लग्नानंतर मित्राने बोलणं बंद केल्याचा राग; मैत्रिणीने केलं धक्कादायक कृत्य

रागाच्या भरात कधी, कोण काय पाऊल उचलेलं याचा काही नेम नाही. असाच एक प्रकार आता जालना जिल्ह्यातून समोर आला आहे.

  • Share this:
जालना, 19 जून: आपल्या मित्राचं लग्न झाल्यावर त्याने आपल्यासोबत बोलणं बंद केल्याचा राग आला आणि त्यानंतर तरुणीने असं काही कृत्य केलं ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. घटना जालना (Jalna) जिल्ह्यातील घनसावंगी (Ghansavangi) येथील आहे. या प्रकरणात आरोपी मुलीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. झालं असं की, घनसावंगी येथील मुलीचं 10 जानेवारी 2021 रोजी लग्न झालं. लग्नानंतर पीडित मुलीच्या पतीकडे असलेल्या मोबाइलवर बनावट इंस्टाग्राम अकाऊंट्सवरून (Fake Instagram account) अश्लील मेसेजेस येऊ लागले. या महिलेच्या नावाने अश्लील चॅट आणि मेसेजेस (obscene messages) येऊ लागले. यानंतर या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. आपल्या पतीच्या नावावर अश्लील भाषेत मेसेज टाकून बदनामी करण्यात येत असल्याचं पीडित महिलेने म्हटलं. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता बनावट इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हे मेसेज करण्यात येत असल्याचं सायबर पोलिसांच्या लक्षात आले. VIDEO : 'होमगार्डसारखा राहा की, खाकी वर्दी घातली म्हणून...', पुण्यात आलिशान गाडीतील महिला पोलिसाची मुजोरी मग पोलिसांनी या बनावट अकाऊंट्सची माहिती काढली असता एका मुलीने सदर अकाऊंट तयार केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या मुलीची चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबुल केला. यानंतर संबंधित मुलीवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. आरोपी मुलीने सांगितले की, लग्नानंतर या मुलाने माझ्यासोबत बोलणे बंद केले आणि त्याचा राग आल्याने बनावट इंस्टाग्राम अकाऊंट तयार करुन इंस्टाग्रामवर अश्लील मेसेज पाठवण्यात आले.
Published by:Sunil Desale
First published: