राज्य अंगणवाडी कर्मचारी 11 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर

 राज्य अंगणवाडी कर्मचारी 11 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर

राज्य अंगडवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे कर्मचारी संपावर जाणार आहेत.

  • Share this:

09 सप्टेंबर: राज्यातील अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनात वाढ करण्याच्या मागणीसाठी राज्यातील २ लाख अंगणवाडी कर्मचारी सोमवार ११ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.  राज्य अंगडवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे कर्मचारी संपावर जाणार आहेत.

वेतनवाढीसाठी सरकारने मानधन वाढ समिती गठित केली होती. समितीने सादर केलेल्या शिफारशीनुसार  मानधन वाढी संदर्भात मे २०१७ पर्यंत सरकारी आदेश काढण्याचे आश्वासन महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले होते. मात्र आजपर्यंत याबाबत सरकारी पातळीवर कोणतीही कारवाई झालेली नाही. म्हणून ११ सप्टेंबरपासून राज्यातील २ लाख अंगणवाडी कर्मचारी  संपावर जात आहेत.

First published: September 9, 2017, 8:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading