• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • अंगणवाडी सेविकेने Corona साठी देणगीत दिला संपूर्ण पगार, भारवलेल्या रोहित पवारांनी केले कौतुक

अंगणवाडी सेविकेने Corona साठी देणगीत दिला संपूर्ण पगार, भारवलेल्या रोहित पवारांनी केले कौतुक

मुस्लिमांमध्ये पवित्र मानला जाणारा रमजान महिना नुकताच संपला. या महिन्यात रोजे ठेवले जातात आणि पुण्य कमावण्यासाठी दान करावं असंही सांगण्यात आलं आहे. आपल्या उत्पन्नातील एक ठरावीक भाग दान करावा असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळंच मीनाताई यांनी कोरोनाच्या संकटासाठी एक पगार देऊ केला.

 • Share this:
  अहमदनगर, 17 मे : कोरोनाच्या या महामारीमुळं (Corona Pandemic) देशासमोरच मोठं संकट उभं राहिलं आहे. या संकटातून सावरण्यासाठी अनेकजण मदत करत आहेत. अनेक मोठ्या उद्योजकांनी (Bussinessman) शेकडो, हजारो कोटींची मदत सरकारला केली आहे. त्यांचं काम मोठं आहे. पण ज्यांना खायलाही कमाई पुरत नाही, ते जर स्वतःच्या पोटाला चिमटा काढून या कामासाठी मदत करत असेल तर त्याचं महत्त्वं मोठं असतं. जामखेडमधल्या (Jamkhed) एका अंगणवाडी सेविकेनं (Anganwadi Worker) असाच आदर्श घालून दिला आहे. (वाचा-Beed News कोरोनामुळे पत्नीने घेतला जगातून निरोप, पतीने रुग्णालयातून पळवला मृतदेह!) जामखेडमधील जवळा याठिकाणी मीनाताई मुसा शेख या महिला अंगणवाडी सेविका म्हणून काम करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार प्रचंड आर्थिक संकटात आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांचा एका दिवसाचा पगार सरकारला कोरोनासाठी मदतनिधी म्हणून द्यावा असं आवाहन करण्यात आलं होतं. अनेक चांगल्या पदावर असलेल्या अधिकाऱ्यांनीही याला विरोध केला. पण त्याचवेळी मीनाताई मुसा शेख यांनी एका दिवसाचा नाही तर पूर्ण एक महिन्याचा पगार हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देणगी म्हणून दिला. जामखेड याठिकाणी डॉ.आरोळे कोविड केअर सेंटरला देणगी रुपात मीनताई मुसा शेख यांनी त्यांचा एका महिन्याचा पगार दिला. मुस्लिमांमध्ये पवित्र मानला जाणारा रमजान महिना नुकताच संपला. या महिन्यात रोजे ठेवले जातात आणि पुण्य कमावण्यासाठी दान करावं असंही सांगण्यात आलं आहे. आपल्या उत्पन्नातील एक ठरावीक भाग दान करावा असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळंच मीनाताई यांनी कोरोनाच्या संकटासाठी एक पगार देऊ केला. (वाचा-Cyclone Tauktae : चक्रीवादळाचा तडाखा, उघड्यावर पडला संसार, घर झाले जमीनदोस्त) दरम्यान, मीनाताईंनी केलेल्या या चांगल्या कामाची दखल अनेक माध्यमांनीही घेतली. त्यानंतर जामखेड-कर्जतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही याची दखल घेतली. त्यांनी एक ट्विट करत मीनाताई मुसा शेख यांचं कौतुक केलं आहे. 'मीनाताई तुमची दानत पाहून अक्षरशः भारावून गेलो' असं म्हणत त्यांनी मीनाताईंचे आभार मानले. मुळात अंगणवाडी सेविकांना पाच ते आठ हजार रुपये मानधन मिळतं. इतरांनी केलेल्या लाखो, कोट्यवधींच्या तुलनेत हे दान अत्यल्प आहे. मात्र, शेख यांच्यासाठी त्यांनी दिलेली देणगी ही त्यांचा एका महिन्याचा पगार आहे. संसाराचा गाडा चालावा म्हणून महिनाभर झटल्यानंतर मिळणारी रक्कम ही अशा कुटुंबांसाठी फार मोठी असते. ती पूर्ण रक्कम दिल्यानं त्यांच्या या रकमेचं मोलही त्या लाखो, कोट्यवधी रुपयांएवढंच किंबहुना त्यापेक्षाही अधिक आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
  Published by:News18 Desk
  First published: