...नाहीतर आत्मदहन करू, अंगणवाडी सेविकांचं पंकजा मुंडेंना पत्र

...नाहीतर आत्मदहन करू, अंगणवाडी सेविकांचं पंकजा मुंडेंना पत्र

आमची सेवा मेस्मा कायद्याअंतर्गत आणू नका, अन्यथा आम्ही आत्मदहन करू, असा इशारा शेकडो अंगणवाडी सेविकांनी सरकारला दिलाय.

  • Share this:

19 मार्च : आमची सेवा मेस्मा कायद्याअंतर्गत आणू नका, अन्यथा आम्ही आत्मदहन करू, असा इशारा शेकडो अंगणवाडी सेविकांनी सरकारला दिलाय. अनेक सेविकांनी पंकजा मुंडेंना तसं पत्र लिहिलंय.

घराची जबाबदारी आमच्यावर असून ऐंशीच्या दशकात आम्ही अंगणवाडी सेविका म्हणून कामास सुरुवात केली. आता सरकार एका आदेशाने आमचे निवृत्तीचे वय ६० करणार असेल तर आम्ही जगायचे कसे, असा सवालही त्यांनी केलाय.

भाजप सरकारने राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या संपाचा धसका घेतला असून अंगणवाडी सेविकांनी संप करू नये यासाठी आता अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र अत्यावश्यक कायद्याच्या अर्थात मेस्माच्या कक्षेत आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

भाजप सरकारची ही जुलूमशाही ब्रिटिश सरकारला लाजवेल अशी असल्याची संतप्त प्रतिक्रिया अंगणवाडी सेविकांकडून व्यक्त केली जात आहे. वेळेवर मानधन न मिळणाऱ्या अंगणवाडी सेविकांची जगण्याचीच मारामार असताना 'मेस्मा' जाहीर करून सरकार अंगणवाडी सेविकांनाही आत्महत्येसाठी प्रवृत्त करत असल्याचा आरोप राज्य अंगणवाडी कृती समितीचे नेते एम. ए. पाटील यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 19, 2018 11:09 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading